अमित ठाकरेंच्‍या राजकीय / अमित ठाकरेंच्‍या राजकीय लाँचिंगची तयारी सुरू, 3 दिवस राज ठाकरेंसोबत होते मराठवाडा दौऱ्यात

फाईल फोटो. फाईल फोटो.
राज ठाकरे यांची होणारी स्नुषा मिताली देखील या दौऱ्याच्या निमित्ताने शहरात आली होती. राज ठाकरे यांची होणारी स्नुषा मिताली देखील या दौऱ्याच्या निमित्ताने शहरात आली होती.
Aug 03,2018 04:46:00 PM IST

औरंगाबाद - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय प्रशिक्षण सुरू असल्याचे दिसते आहे. राज यांच्या औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात अमित हे त्यांच्या सोबत होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांचा साधेपणा आणि मनमोकळ्या स्वभावामुळे कार्यकर्ते ही त्यांच्याजवळ गेले. त्यामुळे अमित ठाकरे यांचेही या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाँचिंग होण्याची शक्यता आहे.

अमित यांच्यासोबत मुंबईहून त्यांची मित्र मंडळी देखील आली होती. मात्र या संपूर्ण दौऱ्यात अमित हे कुठेही प्रसारमाध्यमांसमोर आले नाही. मेळाव्याच्या वेळी देखील त्यांनी तापडिया नाट्यमंदिरात विंगेत उभा राहून राज यांचे भाषण ऐकले, पैठण दौऱ्यातही अमित त्यांच्या सोबतच होते. मात्र पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात किंवा सभेत ते मनसेनेत्यांमुळे व्यासपीठावर बसले नाहीत. मात्र शहरात राज यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या प्रत्येक बॅनरवर अमित यांचा फोटो पाहायला मिळाला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची होणारी स्नुषा मिताली देखील या दौऱ्याच्या निमित्ताने शहरात आली होती. शिवसेनेत ज्याप्रमाणे युवासेनेची राज्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अमित यांच्याकडे मनविसेचे राज्यभराचे काम येऊ शकते.

अमित कार्यकर्त्यांसोबत क्रिकेटही खेळले
अमित हे उत्तम खेळाडू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. ते उत्तम फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात. व्यंगचित्र काढण्याचा देखील त्यांचा छंद आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या लॉनवर देखील ते कार्यकर्त्यांसोबत क्रिकेट खेळले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

X
फाईल फोटो.फाईल फोटो.
राज ठाकरे यांची होणारी स्नुषा मिताली देखील या दौऱ्याच्या निमित्ताने शहरात आली होती.राज ठाकरे यांची होणारी स्नुषा मिताली देखील या दौऱ्याच्या निमित्ताने शहरात आली होती.