आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात त्यांनी आपल्या आईचे स्मरण केले आहे. यामागील भावनिक कारणही त्यांनी पोस्टमध्ये शेअर केले आहे. या भावनिक पोस्टसोबत बिग बींनी डाव्या डोळ्याचा फोटो शेअर केला आहे. बिग बींना डाव्या डोळ्याचा त्रास सुरु झाला आहे.
बिग बींनी पुढे लिहिले, "पण आता आई नाहीये, वीजेद्वारे रुमाल गरम करून शेक घेत आहे.. पण त्याचा काही उपयोग नाही. आईचा पदर तर आईचा पदरच असतो, त्याला दुस-या कशाची सर नाही."
पोस्टमुळे सोशल मीडिया यूजर्सही झाले भावूक
अमिताभ यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडिया यूजर्सही भावूक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, "आई देव आहे. आई हेच जग आहे. आई घर आहे. घरात आई नसली तर घर बेघर असल्यासारखे वाटते."
आणखी एका यूजरने लिहिले, "हो भाऊ, आईच्या पदरात सर्व आजाचारांवर उपचार होता. आजारपणामुळे डोळे बरे झाले आणि नाक स्वच्छ झाले. गर्मीत थंडा वारा मिळाला, तर अश्रूदेखील पुसले गेले.'
गेल्यावर्षी दिले होते निवृत्तीचे संकेत
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यांनी लिहिले होते, "मी निवृत्त झाले पाहिजे, मन काहीतरी वेगळं विचार करत आहे आणि बोटे काहीतरी वेगळा... हा संकेत आहे." ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना त्यांनी हे लिहिले होते. खराब हवामानामुळे त्यांना चंदीगड ते मनाली असा रस्त्याने प्रवास करावा लागला होता. ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या काळात फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तथापि, काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते कामावर परतले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.