आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक@76: एवढ्या हजार कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत बच्चन दाम्पत्य, फ्रान्ससह सहा शहरांत आहे बिग बींची प्रॉपर्टी, 9 लाखांचे तर फक्त पेन आहेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः आज बॉलिवूडचे महानायत अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असून ते 76 वर्षांचे झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत. त्यांनी स्वतःची एक हजार कोटींची संपत्ती घोषित केली आहेत. राज्यसभा नॉमिनेशनच्या वेळी जया बच्चन यांनी जे एफिडेविट जमा केले होते, त्यानुसार, जया आणि अमिताभ यांच्याजवळ 460 कोटींची अचल आणि 343 कोटींची चल संपत्ती आहे.

 

कोट्यवधींची ज्वेलरी...

- एफिडेविटनुसार, अमिताभ आणि जया यांच्याजवळ एकुण 62 कोटींचे सोन्याचे दागिने आहेत.
- यापैकी 36 कोटींची ज्वेलरी अमिताभ यांची आहे.


किती गाड्या आहेत...
- अमिताभ यांच्याजवळ 12 गाड्या असून त्यांची किंमत 13 कोटींहून अधिक आहे.
- यामध्ये रोल्स रॉयस, तीन मर्सिडीज, पोर्शे, रेंज रोवर या गाड्यांचा समावेश आहे.
- अमिताभ यांच्याजवळ या आलिशान गाड्यांव्यतिरिक्त टाटा नॅनो आणि ट्रॅक्टरही आहे.

 

किती रुपयांच्या घड्याळी आहेत...
- अमिताभ यांच्याजवळ 3.4 कोटी रुपयांच्या घड्याळी आहेत.
- तर जया बच्चन यांच्याजवळ असलेल्या घड्याळींची किंमत 51 लाख रुपये आहे.
- अमिताभ यांच्याजवळ तब्बल नऊ लाख रुपये किंमतीचे पेन आहेत.

 

रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी किती आहे...
- बच्चन कुटुंबाजवळ 3175 स्केअर मीटरची रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी फ्रान्समध्ये आहे.
- नोएडा, भोपाल, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगर येथेही बच्चन कुटुंबीयांची प्रॉपर्टी आहे,
- जया यांच्या नावे 1.22 हेक्टर अॅग्रीकल्चर प्लॉट आहे. त्याची किंमत  2.2 कोटी रुपये आहे.
- याचप्रमाणे अमिताभ यांच्या नावेही 3 एकर प्लॉट असून त्याची किंमत 5.7 कोटींच्या घरात आहे. ही जमीन बाराबंकी येथे आहे. 

बातम्या आणखी आहेत...