आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा समोरा समोर आले रेखा आणि अमिताभ बच्चन, ना एकमेकांकडे पहिले ना एकमेकांशी बोलले, ते असे 4 प्रसंग जेव्हा ते दोघे आले समोर समोर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रील लाइफपासून ते रियल लाइफपर्यंत रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीला फॅन्सने नेहमीच पसंत केले आहे. दोघांनी सोबत अनेक चित्रपट केले मात्र चर्चेत फिल्म 'सिलसिला'(1981) राहिली. 'सिलसिला' रिलीज होऊन आता 38 वर्षे झाली आहेत. मात्र त्यांनतर कधीच हे दोघे मोठ्या पडद्यावर लीड रोलमध्ये दिसले नाहीत. खरे तर खऱ्या आयुष्यातही असेच आहे. रेखाजी आणि अमिताभ बच्चन यांना अनेक वर्षांपासऊन कुणीही एकत्र बोलताना पहिले नाही. असे अनेक प्रसंग आले जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखाजी एकाच ठिकाणी इव्हेन्ट किंवा पार्टीमध्ये पोहोचले. पण दोघेही कधीच आपापसांत बोलले नाहीत. 

 

या प्रसंगी रेखाजी-अमिताभ यांनी एकमेकांना केले इग्नोर...

#1
अशातच रेखाजी फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर 2019 च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये पोहिचल्या होत्या. यावेळचा त्यानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जेव्हा रेखाजी इव्हेंटमध्ये पोज देत होत्या तेव्हा मागे अमिताभ बच्चन यांचे पोस्टर होते. रेखाजींना हे कळलेच नाही कि त्या तिथेच उभ्या राहून पोज देत आहेत. मात्र जेव्हा त्यांच्या हे लक्षात आले तेव्हा त्या थोड्या गोंधळाला आणि मग बिग बींना इग्नोर करत तिथून बाजूला सरकल्या. 

 

#2
डब्बू रत्नानीच्या लॉंन्चच्या काही दिवसांपूर्वीची अमिताभ बच्चन आणि रेखाजी एकमेकांना इग्नोर करताना दिसले होते. हा प्रसंग होता मुकेश भट्ट यांची मुलगी साक्षीच्या वेडिंग रिसेप्शनचा. या फंक्शनमधेही अमिताभ पत्नी जया बच्चन यांच्यासोबतच पोहोचले होते. पार्टीमध्ये रेखाजीही पोहोचल्या होत्या. यावेळीही रेखाजी, अमिताभ आणि जया यांना इग्नोर करतताना दिसल्या. 

 

#3
रेखा यांनी यापूर्वी अमिताभ बच्चन यांना फिल्म 'सरकार' च्या प्रीमियरदरम्यानही पाहून ना पाहिल्यासारखे केले होते. त्यावेळीही बिग बी आणि रेखा यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये हे दोघे एकमेकांना इग्नोर करताना दिसत होते. 

 

#4
रेखा आणि अमिताभ यांचा आणखी एकदा असाच एक सीन कॅमेऱ्यात कैद झाला होता. जेव्हा दोघेही एकमेकांना इग्नोर करत होते. तो प्रसंग सेलिब्रेशनचा होता जेव्हा शशि कपूर यांना दादासाहेब फालके अवॉर्ड मिळाला होता. यावेळीही दोन्ही दिग्गज एकमेकांसमोर तर होते पण एकमेकांना इग्नोर करत होते. 

 

बातम्या आणखी आहेत...