आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी मागितली चाहत्यांची माफी, रविवारी भेटू न शकल्यामुळे व्यक्त केले दुःख 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अमिताभ बच्चन शुक्रवारी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयातून परतले आहेत. त्यांना कारने घरी जाताना स्पॉट केले गेले. यावेळी त्यांच्यासोबत जया बच्चन आणि अभिषेक बच्चन देखील सोबत होते. सर्वानाच माहित आहे की, अमिताभ बच्चन दर रविवारी सकाळी घराबाहेर आपल्या फॅन्सला भेटतात. पण यावेळी ते शक्य झाले नाही. आता घरी आल्याच्या दोन दिवसांनंतर अमिताभ यांनी एक ट्विट केले आहे, त्यांच्या या ट्विटवरून कळते की, त्यांचे फॅन्स त्यांच्यासाठी किती काळजीमध्ये आहेत. या रविवारी फॅन्सला भेटू ना शकल्यामुळे बिग बींनी त्यांची माफी मागितली आहे. त्यांनी ट्विट केले, "मी नाही सांगितले होते, तरीही लोक रविवारी घराबाहेर भेटण्यासाठी आले, मी माफी मागतो, बाहेर येऊ शकत नाही." अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट खूप पसंत केले आजच्या आहे. 

बातम्या आणखी आहेत...