आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांना सयाजी रत्न अवॉर्ड, प्रायव्हेट प्लेनने पोहोचलेल्या महानायकासाठी एयरपोर्ट अथॉरिटीने मोडला नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडेदरा. बरोडा मॅनेजमेंट असोसिएशन व्दारे महाराज सयाजीराव गायकवाड स्मृती आणि सन्मानामध्ये सयाजी रत्न अवॉर्ड देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांना देण्यात आला होता. 2018 मध्ये हा पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. अमिताभ बच्चन प्रायव्हेट प्लेनने दुपारी 12.20 वाजता वडोदरा एयपोर्टवर पोहोचले. एयपोर्टवर त्यांच्या चाहत्यांनी त्याचे स्वागत केले. बरोडा असोसिएशनच्या सदस्यांनी अमिताभ बच्चन यांना एयरपोर्टपासून लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आणले. पॅलेसमध्ये राज कुटूंब आणि असोसिएशनच्या सदस्यांसोबत लंच केल्यानंतर अमिताभ बच्चन दुपारी 2.46 वाजता नवलखी मैदानात पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले. राजामाता सुभांगिनी राज गायकवाड, महाराज समरजीत सिंह गायकवाड, अवॉर्डचे को-ऑर्डिनेटर समीर पारीखसोबतच महानुभवांव्दारे अमिताभ बच्चन यांना पुरस्कार देण्यात आला. संध्याकाळी 4.00 वाजता कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर अमिताभ बच्चन मुंबईला रवाना झाले. 


अरविंद पंड्याची पत्नी भेटायला गेली पण गर्दीत भेटू शकली नाही 
कुलीच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यांनी बरे व्हावे ही प्रार्थना करत पडोदराचे अरविंद पंड्या यांनी उलटे धावत मुंबई गाठली होती. त्यांनाही कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. अरविंद पंड्याने सांगितले की, आमंत्रण मिळूनही मी कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो नाही. त्यांची पत्नी रुपल, मुलगा आकाश आणि सूरज कार्यक्रमात होते. रुपल पंड्याने सांगितले की, त्या हॉलमध्ये सर्वात मागे बसल्या होत्या. कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर अमिताभ यांना भेटून त्यांना त्यांच्या घरातील फोटोज दाखवायचे होते. पण गर्दीमुळे हे शक्य झाले नाही. 

 

एका चाहत्याने बनवले आहे मंदिर 
अरविंद पड्याने सांगितले की, अमिताभ आमच्यासाठी देव आहेत. मी त्यांच्यासाठी घरात मंदीर बनवले आहे. सर्वात पहिले अमिताभ यांचे दर्शन घेतो. मी 16 वेळा अमिताभ यांना भेटलो आहे. 

 

अमिताभ यांची कार एयरपोर्टच्या एप्रनपर्यंत नेण्यात आली 
आमिताभ बच्चन यांना घेण्यासाठी शहरातील उद्योगपतीची कार एयरपोर्टच्या एप्रन म्हणजे रन-वेपर्यंत नेण्याची परवाणगी देण्यात आली होती. एयरपोर्टच्या अथॉरिटीनुसार कॅबिनेट मंत्री आणि देशाच्या सन्मानित व्यक्तींना ही सुविधा देण्यात येते.


यापुर्वी रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांना मिळाला आहे पुरस्कार 
कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर अमिताभ बच्चन हॉलमधून निघून कारपर्यंत गेले. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. चाहत्यांनी आपल्यासोबतचे पेंटिंग्स आणि फोटोग्राफ्स दाखवून ऑटोग्राफ दाखवण्याची मागणी केली. अमिताभ यांनी कार जवळ उभे राहून काही ऑटोग्राफ दिले आणि तिथून निघून गेले. 
 

बातम्या आणखी आहेत...