आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्यांच्या हातून अमिताभ यांना इजा झाली त्या पुनीत इस्सरने सांगितली आपबिती, घटनेनंतर येत होते धमकीचे पत्र  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज (11 ऑक्टोबर) वयाची 77 वर्षे पूर्ण केली आहेत. पण 2 ऑगस्ट 1982 ही तारीख ही त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची तारीख आहे. कारण याच दिवशी अमिताभ बच्चन मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. आम्ही सांगतोय, 1982 मधील त्या घटनेविषयी, ज्यामध्ये अमिताभ बच्चन मृत्यूच्या दारात गेले होते. 26 जुलै 1982 रोजी बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' सिनेमाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना सिनेमासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून 2 ऑगस्ट रोजी त्यांना जीवनदान दिले होते. बिग बी पुन्हा सिनेसृष्टीत परतले आणि त्यांनी 'कुली'चे शूटिंग पूर्ण केले. हा सिनेमा खूप गाजला होता. पण या घटनेनंतर पुनीत इस्सर ज्यांच्यामुळे बिग बी गंभीर जखमी झाले होते, ते मात्र लोकांच्या नजरेत खलनायक ठरले. पुनीत इस्सर यांचा लोक तिरस्कार करु लागले होते. तीन ते चार वर्षे ते बेरोजगार झाले होते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर पुनीत इस्सर यांच्या आयुष्य कसे बदलले होते...

अतिशय कठीण काळ... 
एका मुलाखतीत पुनीत इस्सर यांनी त्यांची आपबिती सांगितली होती. ते म्हणाले, बिग बी गंभीर जखमी झाले होते. तो काळ माझ्यासाठी अतिशय अवघड होता. कारण मीडियात वेगवेगळ्या बातम्या प्रकाशित होत होत्या. त्यावेळी मी शत्रुघ्न सिन्हासोबत एक सिनेमा करत होतो. शत्रुघ्न सिन्हा बिग बींना बघण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते, तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत तिथे गेलो. दुस-याच दिवशी वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली, की मी शत्रुघ्न सिन्हा यांच्या गटातील असून जाणूनबुजून अमितजींना जखमी केले. तर कुणी म्हटले, की यासाठी राजेश खन्ना यांनी मला पैसे दिले होते. तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता. 

जीवे मारण्याची धमकी देत होते लोक... 
पुनीत यांनी सांगितले, 'कुली'मध्ये अमिताभजींचा अपघात झाला होता तेव्हा माझ्या घरी धमकी असलेले पत्र येत होते. लोक म्हणायचे की, तुम्हाला ठार मारण्यात येईल. तुम्ही आमच्या आवडत्या कलाकारासोबत असे का केले? लोक एवढे भावुक होतात की, ते सत्य विसरून पडद्यावरील घटनेवर विश्वास ठेवतात. तथापि, ही दुसरी घटना दुर्दैवी होती. मात्र, मी एक कलावंत असल्याचे अनेकदा लोकांना सांगावे लागले. कळत-नकळत तुम्हाला दुखावले असेल तर मला क्षमा करा. मी माफी मागतो. मी जाणूनबुजून असे केले नाही. बऱ्याच लोकांनी माझ्या भावना समजून घेतल्या. मात्र, जे समजू शकले नाहीत त्यांना म्हणालो, जी शिक्षा द्यायची ती द्या. 1982 मध्ये झालेल्या या घटनेनंतर माझ्यामुळेच माझे आवडते कलाकार अमिताभ जखमी झाले होते, हे ऐकून वाईट वाटत होते. खूप दु:ख व्हायचे. मी पश्चात्ताप करत होतो. वरून लोकांचे धमकीचे पत्र आणि फोनही येत होते. 

अमिताभ यांनी केले होते माफ... 
पुनीत या अपघातामुळे खूप दु:खी आहे, त्याला धमक्या येत आहेत, हे अमितजींना माहीत झाले तेव्हा ते लोकांना म्हणाले, पुनीतला बोलावून घ्या. मी भेटण्यासाठी गेलो तेव्हा ते म्हणाले, 'तू टेन्शन घेऊ नकोस बेटा! तू माझा धाकटा भाऊ आहेस. तू हे जाणूनबुजून केलेले नाही. 

पुनीत यांच्या पत्नीने दिले होते बिग बींना रक्त... 
या अपघातानंतर बिग बींवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी पुनीत यांची पत्नी दीपाली इस्सर यांनी बिग बींना रक्त दिले होते.

तीन ते चार वर्षे होते बेरोजगार...
याकाळात तीन ते चार वर्षे ते बेरोजगार होते, असे पुनीत यांनी सांगितले. कुणीही त्यांच्यासोबत काम करण्यास तयार होत नव्हते. याकाळात पत्नी दीपालीचा त्यांना पाठिंबा मिळाला. दीपाली इस्सर यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलली होती.

पुन्हा कधीही अमिताभ यांनी पुनीतसोबत केले नाही काम... 
'कुली' या चित्रपटानंतर बिग बींनी पुनीत इस्सर यांच्यासोबत कधीही काम केले नाही. 1985 साली रिलीज झालेल्या 'मर्द' या सिनेमातून पुनीत यांना काढून टाकण्यात आले होते. 'मर्द'मध्ये अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग मेन लीडमध्ये होते. 

अनेक वर्षांनी मिळाले होते 'महाभारत' मालिकेत काम... 
दीर्घ काळानंतर 'महाभारत' या मालिकेत त्यांना काम मिळाले. 1988-1990 या काळात ही मालिका छोट्या पडद्यावर प्रसारित झाली होती. महाभारतमध्ये पुनीत यांनी दुर्योधनाची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...