आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Buys Agricultural Lands In Muzaffarpur Uttar Pradesh Cost In Crore

अमिताभ बच्‍चन यांनी उत्तर प्रदेशमध्ये खरेदी केली 25 बीघा जमीन, किंमत कोटींच्या घरात, जमिनीसोबत एका घराचाही आहे समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी यूपीच्या काकोरीतील मुज्जफरनगर गावात 25 बीघा जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 15 कोटी असून यात एका घराचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनच्या नावाने सुरु असलेल्या सरस्वती एंटरटेन्मेंट आणि बी-टीम स्पोर्ट्स या कंपनीच्या नावाने 7 डिसेंबर रोजी खरेदी करण्यात आलेल्या जागेची रजिस्ट्री झाली आहे. या जमिनीचा सौदा हा 15 कोटींत झाला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्याजवळ यापूर्वीच या गावात 33 बीघा जमीन आहे. अर्थातच आता ते या गावातील एकुण 58 बीघा जमिनीचे मालक झाले आहेत. बिग बी मुळचे उत्‍तर प्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवाशी असून येथेच त्यांचा जन्म झाला. या ठिकाणी त्यांच्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत.


आईवडील आणि मुलाच्या नावावर जागा...  
बिग बींनी  खरेदी केलेली एकुण जमीन  ही त्यांच्यासह, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चनच्या नावावर आहे. काही काळापूर्वी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदासुद्धा या ठिकाणी जमीन खरेदी करण्याच्या विचाराने आला होता. पण त्यावेळी काही कारणास्तव सौदा होऊ शकला नव्हता. पण त्याला हे ठिकाण पसंत पडले असून भविष्यात या ठिकाणी जमीन खरेदी करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला होता. अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचे म्हणजे ते सध्या 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी  'झुंड'  या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.   

 

बातम्या आणखी आहेत...