आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Completes Five Decades In Industry, Starts With 'Saat Hindustani'

महानायक अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीत पाच दशकं पुर्ण, 'सात हिंदुस्तानी'द्वारे केली होती करिअरची सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंटेंट इनपुट: अमित कर्ण, उमेश उपाध्याय , किरण जैन


7 नोव्हेंबरची तारीख..., पन्नास वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 1969 मध्ये म्हणजेच सात नाेव्हेंबरला भारताच्या िसनेप्रेमी प्रेक्षकांनी अमिताभ बच्चन यांना पडद्यावर पाहिले होते. बॉलिवूडमध्ये एंट्री करून या महानायकाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिनानिमित्त त्यांच्या जीवनाला, त्यांच्या नायकत्वाला आकार देणारे पाच मोठे दिग्दर्शक दिव्य मराठीला त्यांचा पाच दशकांचा प्रवास सांगत आहेत.

  • प्रसिद्धी डोक्यात घुसली नाही, जमिनीवर राहिले - दिग्दर्शक रमेश सिप्पी ( 'शोले' चे दिग्दर्शक )

त्यांच्यासारखा अविस्मरणीय प्रवास फारच क्वचितच लोकांचा आहे. ते बऱ्याच काळापासून वन मॅन इंडस्ट्री राहिलेले आहेत. विशेषत: सत्तर ते ऐंशीच्या दशकात. त्यांना मिळालेल्या प्रत्येक पात्राला त्यांनी आपल्या अभिनयाच्या मदतीने उंचीवर घेऊन गेले. आनंद, दीवार, शोले, चुपके चुपके, कभी-कभी, अमर अकबर अँथनी, नसीब, दोस्तानापासून ते आतापर्यंत. त्यांनी विविध भूमिका साकारल्या. ते अतुलनीय कामगिरी करू शकले, कारण त्यांच्याकडे भाषा समजून घेण्याची आणि त्याचा योग्य वापर करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. एकदा स्टारडम गमावल्यावर ते परत मिळवता येत नाही. मात्र त्यांच्याबाबतीत तसे घडले नाही. खुदा गवाहच्या रिलीजनंतर त्यांचा अघोषित संन्यास असो की एबीसीएलला आलेले अपयश असो, इतके होऊनही त्यांनी पुन्हा भरारी घेतली. स्टारडम त्यांच्या कधी डोक्यात शिरले नाही. ते नेहमी जमिनीवर राहिले, त्यामुळेच ते आजही स्टार आहेत. जंजीरच्या आधीही म्हटले जायचे तो काम करू शकणार नाही. तो निर्मात्यांचे पैसे बुडवेल. मात्र जंजीरनंतर त्यांनी जो वेग पकडला त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि निर्मात्यांनीदेखील त्यांच्या काळात सर्वात जास्त पैसा कमावला. ते प्रत्येक वयाच्या व्यक्तीबरेाबर त्याच्या वयासारखे होऊन काम करत असत. ते प्रेरणादायक आहेत.

  • कामासाठी आला असशील तर आधी पाय कापून ये - दिग्दर्शक टिनू आनंद (कालिया, शहनशहासारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शक)

'सात हिंदुस्तानी' चित्रपटाच्या वेळी आम्ही भेटलो होतो, त्यात आम्ही सेाबत काम करणार होतो. नंतर यात मी जी भूमिका साकारणार होतो, तीच नंतर अमिताभ यांना मिळाली, कारण त्याच वेळी मला सहायक दिग्दर्शकाची ऑफर आली आणि मी ती भूमिका सोडली. त्यानंतर अमिताभ लाेकप्रिय झाले.1972 पासून मी कालियाची तयारी करत होतो. मात्र तो 1981 मध्ये तो रिलीज झाला. मला तेव्हाच त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या संघर्षाचे दिवस पाहिले आहेत. त्या काळात एका अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्यांना म्हटले हाेते, तुझ्यासमोर काेण हिरोइन येईल ? तू जर काम विचारण्यासाठी आला असशील तर आधी तुझे पाय कापून ये.  तेव्हा अमिताभ म्हणाले होते की, 'मी त्यांचा इतका आवडता अभिनेता बनेन की ते माझ्याशिवाय इतर कुणालाच घेणार नाहीत. त्यांची हीच जिद्द त्यांना पुढे घेऊन गेली. 80च्या दशकातील त्यांचा एक किस्सा सांगतो. बऱ्याच वेळा आमच्यात संवादांमुळे भांडण व्हायचे. आमची चांगली गट्टी होती पण प्रत्येक चित्रपटात भांडण व्हायचे. पण शेवटी अमिताभ समजून घेत आणि ऐकतही होते. 'शहशांह'च्या एका दृश्यात त्यांनी पोलिसांच्या गणवेशात यावे अशी इच्छा होती पण त्यांना ब्लेझर घालून तो सीन शूट करायचा होता. मी त्यांना सांगितले, हे चालणार नाही, त्यानंतर त्यांनी शूटिंग बंद केली. नंतर मला बोलावून सांगितले वडिलांना भेटायचे आहे, त्यांना भेटून पुन्हा शूटिंग केले.

  • सेटवर उशिरा आले तर सर्वांनाच सॉरी म्हणत - दिग्दर्शक केसी बोकाडिया ('आज का अर्जुन' आणि 'लाल बादशाह'चे दिग्दर्शक)

नव्वदच्या दशकात आमचे नाते आणखीनच घट्ट झाले. मी एकदा त्यांना आमच्या समाजातील मोठे संत रूपचंद्र महाराजांकडे घेऊन गेलो होतो. त्यांना पाहताच ते म्हणाले होते, हे गेल्या जन्मात मोठे तपस्वी होते, आता तर काही नाही, मात्र पुढे त्यांचा मोठा भाग्योदय होईल. माझ्या पूर्ण करिअरमध्ये मी पन्नास ते साठ चित्रपट केले आहेत, मात्र पूर्ण इंडस्ट्रीत मी दोन व्यक्ती अशा पहिल्या ज्या दिग्दर्शकासमोर विद्यार्थ्यांसारखे बसून राहतात, एक रजनीकांत आणि दुसरे अमिताभ बच्चन. आज का अर्जुनचे शूटिंग पूर्ण होताच त्यांनी बोफोर्स प्रकरण जिंकले होते. मग मी त्यांना सांगितले की, आता चित्रपट हिट होईलच आणि तेच घडले. या शूटच्या सुरुवातीलाच मी म्हणालो, अमितजी आमच्या सेटवर नॉनव्हेज येत नाही. ते म्हणाले, बोकाडिया सर, तुम्ही माझ्या तोंडातले बाेलले, मला शाकाहारी भोजनच आवडते. त्यांच्या वागण्याबद्दल जितके बोलले तितके कमी आहे. ते छोटे-मोठे प्रत्येक माणसाशी चांगले वागतात. सेटवर 10 मिनिटेही कधी उशीर झाला तर ते को-स्टार, लाइटमॅन आणि कॅमेरामन सर्वांना सॉरी म्हणतात. आम्ही जयपूरमध्ये लाल बादशहाचे चित्रीकरण करत होतो. त्या काळात मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत आले आणि त्यांनी अमिताभ यांना स्वत: च्या हातांनी चेक दिला. तेव्हा तेथे लोक इमारतीच्या छतावरून त्यांना पाहायला येत, आयुक्तांनी विंनती केल्यानंतर शूटिंग टाळले.

  • अमितजीच केबीसीचे खरे पितामह - सिद्धार्थ बसू (आपल्या सिनर्जी कंपनीअंतर्गत अमिताभ यांना घेऊन केबीसी लाँच केले)

शतकाच्या सुरुवातीलाच आमच्या दिल्लीतील प्रॉडक्शन हाऊस सिनर्जीला 'कौन बनेगा करोडपती' बनवण्यासाठी विचारणा झाली होती. मला आजही आठवतेय त्या वेळी सूत्रसंचालनासाठी चॅनल फक्त दोन नावांचा विचार करत होते, एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे अमिताभ बच्चन. सुरुवातीला बिग बी या शोसाठी तयार नव्हते. मी तेव्हा अमिताभ यांना लंडनमध्ये भेटलो. तेथे त्यांनी मूळ शोची पूर्ण रेकॉर्डिंग पाहिली. केबीसी पूर्ण 'हू वॉन्ट टू बी मिलिनेयर' सारखाच बनवावा अशी त्यांची इच्छा होती. आम्ही त्यांना आश्वासन दिले तेव्हा कुठे त्यांनी शोसाठी होकार दिला. त्यांना राजी करण्यासाठी बराच वेळ लागला. शो सुरू होण्याच्या तीन महिने आधीच त्यांनी तयारी सुरू केली होती. ते दररोज सेटवर येत आणि बरीच सराव करत. ते परफेक्शनिस्ट आहेत, त्यांना सर्व काही ठीक करण्याची सवय आहे. तेव्हा त्यांना चष्मा वापरायचा नव्हता. हे लक्षात घेऊन स्क्रिप्टचे फॉन्ट मोठे बनवण्यात आले. गृहपाठ न करता ते कधीच स्टेजवर येत नाहीत. ज्या स्पर्धकांशी त्यांचा परिचय होतो त्याची पार्श्वभूमी जाणून घेतल्याशिवाय ते सेटवर येत नाहीत. 2000 मध्ये या शोला जितकी त्यांची गरज होती तितकीच शोच्या फॉर्मेटला तितकीच गरज होती. ते या शोचे पितामह आहेत, या गोष्टीला कोणीच नाकारू शकत नाहीत, ही अतिशयोक्ती वाटणार नाही.

  • विश्वास बसल्यावर संशय घेत नव्हते - शुजित सरकार (ज्येष्ठाची भूमिका करायला लावणारा दिग्दर्शक)

बच्चन साहेब पन्नास वर्षापासून स्टार आहेत. पुढेही राहतील. त्यांच्या बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत, ते सर्जनशील आहेत. ते स्वत:लाच आव्हान देत असतात, त्यामुळे ते आजही टिकून आहेत. त्यांच्यात आजही निरागसपणादेखील आहे. मेगास्टार होते तेव्हाही तो होता. एका स्टारसाठी नवनवीन गोष्टी शिकणे कधी-कधी अवघडदेखील जाते, मात्र त्यांनी ते करुन दाखवले. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी एका ताऱ्याच्या मागे त्याची आधीची प्रतिमा असते. त्याची एक वेगळी फॅन फॉलोइंग असते. एकाच प्रकारच्या प्रतिमेत अडकून जातात. मात्र बच्चन साहेबांनी स्वत: ला कधीच एखाद्या भूमिकेत स्वत:ला कैद केले नाही. खासकरून माझ्या पीकू या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत:लाच चॅलेंज करत ती भूमिका साकारली. आता ते गुलाबो सीताबोमध्येही एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या दिग्दर्शकावर विश्वास त्यांनी विश्वास ठेवला तर पुन्हा कधी ते त्याच्यावर संशय घेत नाहीत. ही त्यांची एक जमेची बाजू आहे. 'पीकू' मध्ये ते ज्या पात्रात हाेते, ती माझी परिकल्पना होती, त्या प्रकारचे ज्येष्ठ माझ्या कुटुंबात राहिलेले आहेत. ते स्वतःही बंगालमध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना तेथील लोकांची माहिती होती. त्या लूकसाठी त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.