आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Could Not Reach At 66th National Film Awards, Shared On His Blog That Suffering With Hamstring And Fever

नॅशनल अवॉर्ड्समध्ये अनुपस्थित राहिलेल्या अमिताभ यांनी शेअर केली माहिती, हेमस्ट्रिंग्ज आणि तापामुळे आहेत त्रस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 23 डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पोहोचू न शकलेल्या अमिताभ यांनी मंगळवारी आपल्या ब्लॉगवर तब्येतीची माहिती शेअर केली. त्याचबरोबर त्यांनी ट्विटरवर असेही लिहिलेकी, 'माझ्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे आभार, मी हळू हळू बरे होत आहे. धन्यवाद"

  • बिग बी हॅमस्ट्रिंगशी लढा देत आहेत..

अमिताभ यांनी ब्लॉगवर लिहिले, ''मान, हॅमस्ट्रिंग, लोअर बॅक आणि मनगटात दुखापत झाली होती. ब-याच काळापासून या दुखण्याने मी त्रस्त आहे. ताप होता. विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला आणि प्रवास नाही. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला मिस केले. हॅमस्ट्रिंगमुळे चालणे आणि बसण्यास अडथळा येतो. यासाठी दीर्घकाळापर्यंत श्वास घेणे आवश्यक आहे. ताप कमी आहे, परंतु फारसा फरक पडलेला नाही. हे सर्व कधी कमी होईल?''

  • 29 डिसेंबर रोजी मिळणार पुरस्कार

77 वर्षीय अमिताभ बच्चन यांना यावर्षी  66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार होता. पण डॉक्टरांनी त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे ते दिल्लीला पोहोचू शकले नाही. आता त्यांना हा पुरस्कार 29 डिसेंबरला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...