आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संजय शर्मा
बिलासपुर : सुपरस्टार अमिताभ बच्चन पुढचे काही दिवस हिमाचलच्या घाटांमध्ये घालवणार आहेत. ते 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनालीला निघाले आहेत. सकाळी वातावरण खराब असल्यामुळे ते बाय रोड मनालीसाठी रवाना झाले. चंदीगडहून जेव्हा ते बिलासपुरला पोहोचले. तेव्हा काही वेळेसाठी ते सर्किट हाउसमध्ये थांबले.
अमिताभ बच्चन बिलासपुरला पोहोचल्याची बातमी मिळताच फॅन्स तिथे पोहोचले. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यापूर्वीच अमिताभ सर्किट हाउसला पोहोचताच पोलिस अधीक्षक आणि कलेक्टरने त्यांचे स्वागत केले. बिग बींसोबत समर्थकांनी फोटो काढले.
अमिताभ यांनी घातले होते स्वेटर आणि कोट
वातावरण बदलल्यामुळे अमिताभ बच्चनदेखील थंडीपासून स्वतःला वाचवत होते. त्यांनी स्वेटर आणि कोट घातला होता. वातावरण बदललाची माहिती मिळाल्यामुळे अपडेट होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनेक कलाकार मनालीला पोहोचले आहेत. सोमवारी अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी राय यांच्यासह अनेकजण पोहोचले आहेत.
काही दिवस हिमवर्षाव होईल. चित्रपटाचे शूटिंग करणे कठीण होईल...
अमिताभ बच्चन पुढेच काही दिवस या प्रदेशातील अनेक भागांमध्ये 'ब्रह्मास्त्र' चे शूटिंग करणार आहेत. मनालीमध्ये मागील दोन दिवसांपासून खूप हिमवर्षाव होत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली होती. अशात मग चित्रपटाचे शूटिंग करणे खूप अवघड होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.