आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा बिग बींनी स्क्रिप्ट लिहिल्या गेल्यानंतर नाकारली होती राकेश रोशन यांची ऑफर, त्यानंतर ऋतिकच्या वडिलांनी त्यांना घेऊन कधी नाही बनवली फिल्म

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सुपरस्टार ऋतिक रोशनचे वडील आणि वेटरन अक्टर, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर राकेश रोशन सध्या थ्रोट कैंसरने ग्रस्त आहेत. मंगलवारी त्यांची सर्जरी झाली, जी सक्सेसफुल झाली. 69 वर्षांच्या राकेश यांनी आपल्या करियरमध्ये सलमान खान, शाहरुख खान, अनिल कपूर, जितेन्द्र आणि अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी कधीच कोणताच चित्रपट डायरेक्ट केला नाही. यामागचे कारण स्वतः खुद राकेश रोशन यांनी DainikBhaskar.com सोबत केलेल्या खास बातचितीत सांगितले.  

 

अमिताभ यांनी स्क्रिप्ट लिहिली गेल्यांनतर का ठोकरली राकेश रोशन यांची ऑफर...
- राकेश रोशन यांनी सांगितले, "मी 'किंग अंकल' (1993) अमिताभ बच्चन यांना लक्षात घेऊन लिहिली होती. दुर्दैवाने त्यांनी हा रोल करण्यास नकार दिला. ते त्यावेळी तीन-चार वर्षांचा ब्रेक घेण्याची प्लानिंग करत होते. फायनली हा रोल नंतर जॅकी श्रॉफ यांना दिला गेला". रिपोर्ट्सनुसार, स्क्रिप्ट लिहिण्याअगोदर अमिताभ यांनी राकेश रोशन यांना फिल्मसाठी होकार दिला होता. पण ऐन वेळी त्यांनी यामध्ये काम करायला नकार दिला. हेच कारण आहे की, राकेश रोशन यांनी नंतर कधीच अमिताभ यांना कोणतीच फिल्म ऑफर केली नाही. 

 

किंग अंकलमध्ये शाहरुखसुद्धा होता... 
- 'किंग अंकल' 1993 च्या हिट चित्रपटांमध्ये सामील होती. शाहरुख खाननेही यामध्ये छोटासा रोल केला होता. त्यासाठी त्याचे कौतुकही झाले होते. त्याच्याव्यतिरिक्त या फिल्ममध्ये अनु अग्रवाल, नगमा, परेश रावल आणि देवेन वर्मा यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. 

बातम्या आणखी आहेत...