वादग्रस्त / 'केबीसी 11'मध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख,  चाहते संतापले, बिग बी आणि वाहिनीने जाहीर माफी मागावी 

अलीकडेच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. 

 

Nov 07,2019 06:08:54 PM IST


एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावर प्रसारित होणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो टीआरपीच्या यादीत आघाडीवर आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या खुमासदार सुत्रसंचालनामुळे या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पण आता हा शो वादात अडकला आहे. अलीकडेच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

जे लोक आत्तापर्यंत झोपले होते, ज्यांना काय घडलेय हे माहिती नाही. जे कोणी महाराजांच्या नावाने पक्ष चालवत आहेत, जे कोणी महाराजांच्या नावाने मते मागून निवडून येत आहेत...त्यांनी हा VDO बघा आणि थोडी जरी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर यावर नक्कीच काहीतरी करा. तुम्हाला जमत नसेल तर, क़ाय करायचे त्ये मी बघतो पण तुम्ही इथुन पुढे त्यांच्या नावाचा कधीच वापर नाही करायचा. महाराष्ट्रामध्ये राहून, खावून लोक चुकीचा इतिहास पसरवत आहेत. ज्या महाराजांच्यामुळे आज हा सेवक अभिमानाने जगतोय. तर मी कधीच महाराजांचा अनादर बिलकुल सहन करणार नाही. ...सचिन गवळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव.

A post shared by Sachin Gawali (@sachingawali_official) on

काय घडले?...
गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले.
१. महाराणा प्रताप
२. राणा सांगा
३. महाराजा रणजीत सिंह
४. शिवाजी


यामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न विचारला जात आहे. काहींनी बिग बींनी याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सचिन गवळीने सोनी वाहिनीला मेल पाठवून जाहीर माफीनामा मागण्यास सांगितले आहे. येत्या 48 तासांत त्यांचे उत्तर आले नाही तर स्वतः सोनी वाहिनीच्या ऑफिसवर जाऊन जाब विचारणार असल्याचे त्याने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितले आहे.

मी सकाळपासून सोनी चॅनेलला वारंवार कॉल करतोय, पण काही नंबर बंद लागत आहेत, काही नंबर चुकीचे लागले तर काही नंबरवर फक्त बेल वाजत आहे. मग Finally KBCवाल्यांना हा मेल पाठवला आहे. येत्या 48 तासात त्यांचे उत्तर आले तर ठीक नाहीतर मी स्वतः सोनी चॅनेलच्या ऑफिसवर जावून जाब विचारणार आहे. बाकीच्यांचे माहिती नाही पण मी तर महाराजांचा अनादर खपवून घेणार नाही. सोबत कोणी येवू दे किंवा नाही येवू दे पण मी मात्र नक्कीच जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.

A post shared by Sachin Gawali (@sachingawali_official) on

X