आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Doing Work In Minus 3 Degree Temperature Of Manali Wrote In A Blog, "Working In 3 Degrees Is Challenging.

कडाक्याच्या थंडीत शूटिंग करत आहेत अमिताभ बच्चन, ब्लॉगमध्ये लिहिले, -3 डिग्रीत काम करणे आव्हानात्मक आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या मनालीत असून येथे ते अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासह रणबीर कपूर आणि आलिया भट महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.  सध्या मनालीचे तापमान मायनस 3 डिग्री आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर आणि ब्लॉगवर सेटवरचे काही फोटो शेअर करुन मनालीच्या थंडीविषयी सांगितले. त्यांनी ट्वीटरवर लिहिले, "माइनस डिग्री, म्हणजे -3... आणि काम करण्याची पद्धत"

  • ब्लॉगमध्ये लिहिले : -3 मध्ये काम करणे आव्हानात्मक...

बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी चेक्सचा शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट आणि सनग्लासेस लावले आहेत. तसेच त्यांच्यासोबत अभिनेता रणबीर कपूरदेखील आहे. त्यांनी ब्लॅगमध्ये लिहिले की, वर्क शेड्युलसाठी ते जंगलात पोहोचले आहेत. काम सुरु आहे. ते लिहितात, "आमच्यासमोर काम वेळेत आणि नैतिकतेने पूर्ण करणे एक आव्हान आहे. पण कसलीही पर्वा न करता आम्ही ते करतोय." पुढे ते लिहितात, 'मनालीत पडलेल्या कडाक्याच्या थंडीत काम करणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. पण प्रत्येक छोट्यातील छोटी गोष्ट पुरवणा-या आमच्या टीमचे धन्यवाद.  त्यांचे काम कौतुकास्पद आहे.'

  • अलीकडेच दिले होते निवृत्तीचे संकेत..

बिग बींनी अलीकडेच त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून निवृत्तीचे संकेत दिले होते.  आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये, अमिताभ यांनी लिहिले होते: 'मला आता निवृत्त झाले पाहिजे ... माझे मन काहीतरी वेगळे विचार करत आहे, बोटे कुठेतरी जात आहेत, हा माझ्या शरीराचा मला संदेश आहे'. गेल्या काही दिवसांपासून बिग बींच्या आरोग्यविषयक तक्रारी सुरु आहेत. त्यामुळे डॉक्टरांनीही त्यांना काम न करण्याची आणि जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र सध्या ते ‘ब्रह्मास्त्र’मध्ये व्यस्त असून या व्यतिरिक्त ते ‘गुलाबो सिताबो’,’चेहरे’ या चित्रपटातही झळकणार आहेत. टीव्ही आणि चित्रपटांव्यतिरिक्त बिग बी जाहिरातींमध्येही बिझी आहेत. कल्याण ज्वेलर्स, कॅडबरी, डाबर, इमामी, आईसीआईसीआई बँक, नेरोलक, जेन मोबाइल, गुजरात टूरिज्मचे ते ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत.

बातम्या आणखी आहेत...