आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले अमिताभ बच्चन, सीएम मदत निधीमध्ये दान केले 51 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : स्टार्स नेहमीच काठी काळात सामान्य नागरिकांची मदत करत असतात. सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाचा विध्वंस सुरु आहे. अशात अमिताभ बच्चन यांनी आसामच्या पूरग्रस्तांसाठी 51 लाख रुपये दान केले आहेत. बिग बींनी केलेल्या या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालने ट्विटरवर त्यांचे आभार मानले आहे. 

 

ट्विटरवर सीएमने मानले आभार... 
मुख्यमंत्री सोनोवालने ट्विटरवर अमिताभ बच्चन यांना धन्यवाद म्हणत लिहिले आहे, 'आम्हाला अमिताभ बच्चन यांच्या योगदानाचे कौतुक आहे. त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 51 लाख रुपये दान केले आहेत. तुमच्या समर्थनासाठी आसामच्या जनतेकडून खूप खूप धन्यवाद.'

 

 

अमिताभ यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लोकांना केले निवेदन... 
अमिताभ यांनीदेखील मुख्यमंत्री सोनोवाल यांच्या ट्वीटचे उत्तर दिले, त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, 'पुरामुळे खूप नुकसान झाले आहे. जनतेची काळजी घ्या आणि मदत पाठवा. सर्वांना निवेदन आहे की, त्यांनी सीएम मदत निधीमध्ये आपले योगदान द्यावे...मी आता दिले आहे.'

 

 

अक्षयने आसाम आणि काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये पूरग्रस्तांसाठी 1-1 कोटी रुपये दिले आहेत. अक्षयने या गोष्टीची माहिती ट्वीट करून दिली होती. अक्षयने ट्वीटमध्ये लिहिले, 'आसाममध्ये 'झालेल्या विध्वंसाबद्दल कळल्याने खूप दुखी आहे. या कठीण प्रसंगी मनुष्य आणि प्राणी दोघांची मदत करणे गरजेचे आहे. सीएम मदत निधी आणि काजीरंगा नॅशनल पार्कचे रेस्क्यू दोन्हींसाठी 1-1 कोटी रुपये दान करू इच्छितो आणि इतरांनाही मदतीची अपील करत आहे.

 

 

सलग चित्रपटात व्यस्त आहेत अमिताभ आणि अक्षय... 
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर बिग बी सध्या लखनऊमध्ये चित्रपट 'गुलाबो सिताबो' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट पुढच्यावर्षी 24 एप्रिलला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त ते 'झुंड' आणि तेलगु चित्रपट 'तेरा यार हूं मैं' मध्येही दिसणार आहेत. 

 

तसेच अक्षयदेखील 'हाउसफुल 4' आणि 'लक्ष्मी बॉम्ब' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'हाउसफुल 4' याचवर्षी 26 ऑक्टोबरला आणि आणि 'लक्ष्मी बॉम्ब' पुढच्यावर्षी 20 जूनला रिलीज होणार आहे.