आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Expressed Grief, Wrote In The Blog 'sad Due To Family Some Members Death'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले दुःख, ब्लॉगमध्ये लिहिले - 'कुटुंबात झालेल्या मृत्यूंमुळे दुःखी आहे'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चनचे म्हणणे आहे की, मुलगा अभिषेक बच्चनचा वाढदिवस आणि एक कौटुंबिक विवाह सोहळा असूनही एका प्रकारची उदासी पसरलेली आहे. त्यांच्यानुसार, याचे कारण कुटुंबात झालेले मृत्यू आणि इतर सदस्यांची खराब असलेली तब्येत आहे. बिग बींनी हे दुःख ब्लॉगमध्ये व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले की, ते कुटुंबात अशातच झालेल्या मृत्यूंमुळे दुःखी आहेत. अमिताभ बच्चन यांच्या विहीणबाई आणि त्यांची मुलगी श्वेता नंदाच्या सासूबाई रितु नंदा यांचे निधन मागच्या महिन्यात झाले होते. त्यांची आठवण काढत आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी लिहिले आहे.  

"कुटुंबात अशातच झालेल्या मृत्यूंमुळे दुःखी आहे. इतरांची तब्येत आणि सर्व अनिश्चितता तुम्हाला घेरून अशा परिथितीमध्ये घेऊन जातात, जिथे तुमचे नैराश्य अचानक वाढते आणि तुम्ही स्वतः काही करण्यात असमर्थ ठरता. अशा परिस्थिती सर्वात सोपे कामदेखील खूप मेहनतीचे आणि सोडून देण्यालायक वाटते. जेव्हा मन अशा एकानंतर एक घडणाऱ्या गोष्टींमध्ये अडकते तेव्हा ती परिस्थिती काय असते हे केवळ तोच माणूस जाणू शकतो जो त्या परिस्थितीतून गेले आहेत. जेव्हा मेंदू यातून बाहेर पडू इच्छितो आणि एका अशा कॅनव्हासमध्ये निघून जातो, ज्याची सुरक्षा मऊ रबरने बनलेली गादी करत आहे." 

बिग बींनी पुढे लिहिले, जेव्हा इच्छा आणि त्याच्या प्रभावाची ताकद कमी होते. मग कुणी स्वतःसाठी आणि इतरांसाठी त्या नैराश्याला तोंड देण्यासाठी आव्हान देणे आणि त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी उभा राहील. तेव्हा त्या एकट्या माणसाच्या शक्तीची माहिती कळेल. स्वतःव्यतिरिक्त अद्याप कुणीही या शक्तीला समजू शकले नाही. ही दगडावर लिहिलेली गोष्ट आहे. शेवटी हा मी राहीन, दुसरे कुणीही नाही. 

शेवटी लिहिल्या बाबूजीच्या भावनिक ओळी.... 

बिग बींनी ब्लॉगच्या शेवटी बाबूजी डॉ. हरिवंशराय बच्चन यांची कविता 'क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी' तील ओळ 'उस नयन से बह सकी कब इस नयन की अश्रु-धारा?' लिहिली आहे. त्यांच्यानुसार, इच्छांची जाणीव होणे, ठोकरने, आत्मसात करणे आणि भंग करण्यासाठी इतर कुणी नाही तर आपण स्वतः जबाबदार असतो.