आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ यांनी बीएमसीला दिल्या स्वच्छतेच्या 25 मशीन आणि ट्रक, उत्तरप्रदेशच्या शेतक-यांची केली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. अमिताभ बच्चन यांनी बृहमुंबई महानगर पालिकेला स्वच्छता करणा-या 25 मशीन आणि एक ट्रक खरेदी करुन गिफ्ट केले आहे. अमिताभ यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. अमिताभ यांनी नुकतेच उत्तरप्रदेशच्या 1398 शेतक-यांचे 4.05 कोटी कर्ज फेडले. 
अमिताभ यांनी ट्वीट करुन लिहिले की, 'मॅन्यूअल पध्दतीने स्वच्छता करणा-यांची अमानवीय दुर्दशा पाहून मी त्यांच्यासाठी 50 मशीन देण्याचे वचन दिले होते. आज मी हे वचन पुर्ण केले. मी 25 लहान मशीन आणि एक मोठी ट्रक मशीन बीएमसीला गिफ्ट केली आहे.'

 

पत्र लिहून म्हणाले - काही करण्याची इच्छा आहे 
24 नोव्हेंबरला अमिताभ बच्चन यांनी स्वच्छता करणा-या कर्मचा-यांच्या संघटनेला मॅन्यूअल स्कॅवेंजर्स असोसिएशन आणि बीएमसीला एक पत्र लिहिले होते. ते म्हणाले होते की, मैनहोल आणि सीवरमध्ये घुसून स्वच्छता करणा-या मॅन्यूअल स्कॅवेंजर्ससाठी मला काही तरी करण्याची इच्छा आहे. बिग बी म्हणाले की, असे करतोय कारण मॅन्यूअल स्कॅवेंजर्सला समाजात सन्मान आणि गौरव मिळावा. अमिताभ यांनी या मशीनच्या खरेदीसाठी 50 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. त्यांनी बीएमसी आणि एमएसला उपकरणांचा योग्य वापर करण्याचा आग्रह केला. 

 

1398 शेतक-यांचे कर्ज फेडले 
अमिताभ यांनी उत्तरप्रदेशच्या 1398 शेतक-यांचे 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी बँकेसोबत करार केला. काही महिन्यांपुर्वी अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रातील 350 शेतक-यांचे कर्ज फेडले होते. यासोबतच त्यांनी 44 शहिद जवानांच्या कुटूंबांना आर्थिक मदत केली होती. केरळ पुरादरम्यानही बिग बी यांनी मदतीसाठी 1.25 कोटी रुपये दिले होते. या पुरादरम्यान त्यांनी कपडे देऊन लोकांची मदत केली होती.

 

मोदींनी केली होती बातचित 
15 सप्टेंबरला 'स्वच्छता ही सेवा अभियान'ची सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगदरम्यान सद्गुरु जग्गी वासुदेव, उद्योगपती रतन टाटा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत बातचित केली होती. मोदी यांनी या अभियानाला स्वच्छता परिवर्तन यज्ञ म्हणत सहयोग देण्याचे अवाहन केले होते. अमिताभ मोदींना म्हणाले होते की, "चार वर्षांपुर्वी तुम्ही स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती आणि एक भारतीय नागरिक म्हणून मी यामध्ये सहभागी होतो. मी एका समुद्र किना-यावर साफ-सफाईसोबतच स्वच्छताच्या अनेक अभियानांशी जोडला गेलेलो होतो."

 

 

 

T 3005 - At the NDTV Cleanathon , 'banega swachch india' , seeing the inhuman plight of the manual scavenger, I had committed to buy 50 machines for them .. today I fulfilled that promise ! 25 small individual machines and one large truck machine gifted to BMC ! pic.twitter.com/6Xn8PFmv3i

— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 24, 2018

Wow! Only you could do it!! What an achievement... the first female boxer to win the #WorldChampionship for an unprecedented 6th time! Congratulations @MangteC... It’s a proud moment for the nation & you are and always will be my inspiration.. Here’s to #MagnificentMary 💪🏼

— PRIYANKA (@priyankachopra) November 24, 2018
बातम्या आणखी आहेत...