आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक@76 : लग्नापूर्वी 43 दिवस बिग बींच्या घरी राहिल्या होत्या सोनिया गांधी, दिल्ली एअरपोर्टवर रिसिव्ह करायला गेले होते स्वतः अमिताभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी 76 वर्षांचे झाले आहेत. ते माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे बालपणीचे मित्र आहेत. पण राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच्याशीही त्यांचे जवळचे नाते असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? अमिताभ यांचे सोनिया गांधींसोबत असलेल्या खास कनेक्शनचा उल्लेख राशिद किदवई यांच्या 'नेता- अभिनेता : बॉलीवुड स्टार पावर इन इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात आहे. 


लग्नापूर्वी 43 दिवस बिग बींच्या घरी वास्तव्याला होत्या सोनिया गांधी... 
- किदवई यांच्या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, राजीव आणि सोनिया यांची भेट झाली ते वर्ष होते 1965. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर सोनिया आणि राजीव यांचे लग्न झाले. 13 जानेवारी 1968 रोजी सोनिया प्रथमच भारतात आल्या होत्या. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांना घेण्यासाठी राजीव गांधींचे बालपणीचे मित्र आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन गेले होते. 25 फेब्रुवारी रोजी सोनिया आणि राजीव यांचे लग्न झाले, तोपर्यंत त्या बच्चन कुटुंबियाच्या घरी राहिल्या होत्या.

 

तेजी बच्चन यांनी मुलीसारखे सांभाळले होते सोनियांना
- राजीव आणि सोनिया यांच्या तीन वर्षांच्या डेटिंगनंतर 1968 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. भारतात आल्यानंतर लग्नापर्यंत त्या बच्चन कुटुंबासोबत राहिल्या. अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन आणि राजीव गांधींच्या आई इंदिरा गांधी या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मुलाच्या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. सोनिया आणि राजीव यांच्या संबंधाची माहिती इंदिरांना करुन देण्याची जबाबदारी तेजी बच्चन यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी जवळपास दोन महिने गेले. तोपर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहात होत्या. अखेर इंदिरांनी विवाहाला मान्यता दिली आणि 25 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी राजीव-सोनिया विवाहबंधनात अडकले. 


- सोनिया यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "तेजी आंटी माझी तिसरी आई आहे.. माझी पहिली आई इटलीत आहे, दुस-या माझ्या सासूबाई इंदिरा गांधी आहेत. तर तिसरी आई या तेजी आंटी आहेत. अमिताभ आणि अजिताभ हे माझे भाऊ आहेत." 

 

अमिताभ यांच्या आई-वडिलांनी केले कन्यादान
लग्नाच्या वेळी सोनिया गांधींचे कुटुंब इटलीत होते. त्यामुळे अमिताभ यांचे वडील हरिवंशराय आणि आई तेजी यांनी सोनियांचे कन्यादान केले होते.

बातम्या आणखी आहेत...