• Home
  • News
  • Amitabh Bachchan, Kajol, Rani and their family also arrived in Durga Puja to pray the goddess.

मुंबई / देवीच्या दर्शनासाठी दुर्गा पूजेमध्ये पोहोचले अमिताभ बच्चन, काजोल, राणी, त्यांची फॅमिलीदेखील दिसली 

काजोलचे फॅमिली मेंबर्सदेखील तिथे उपस्थित होते

​​​​​​​

दिव्य मराठी वेब टीम

Oct 06,2019 05:48:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन रविवारी पत्नी जया बच्चन यांच्यासोबत नॉर्थ बॉम्बे सर्बोजनिन दुर्गा पूजा मंडळात देवी दुर्गेच्या दर्शनासाठी पोहोचले होते. बिग बींनी यादरम्यान व्हाइट कुर्ता पायजामासोबत शॉल घेतलेली होती. तसेच जया रेड बॉर्डर असलेल्या व्हाइट सिल्क मध्ये होत्या. बच्चन दाम्पत्यांची भेट काजोल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत झाली. सर्वजण बराच वेळ तिथे क्वालिटी टाइम घालवताना दिसले. बिग बी आणि जया यांनी सर्वांसोबत ग्रुप फोटोदेखील काढला.


काजोलचे फॅमिली मेंबर्सदेखील तिथे उपस्थित होते...
दुर्गा पूजेच्या मंडळात काजोल मुलगा युगसोबत पोहोचला होता. तिथे तिची कझिन राणी मुखर्जी, शरबानी मुखर्जी आणि अयान मुखर्जीदेखील उपस्थित होते. यादरम्यान काजोलने यलो कलर, आणि राणी, शरबानीने रेड कलरची साडी घातलेली होती. काजोलचा मुलगा यलो कुर्ता आणि व्हाइट पायजामा घातला होता तर अयान मुखर्जी रेड कुर्ता, व्हाइट पायजामा आणि क्रीम कलरच्या जॅकेटमध्ये दिसला. तिथे सर्वच मुखर्जी कझिन्सची जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाली.

X
COMMENT