आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया-रेखापूर्वी मराठी मुलीच्या प्रेमात पडले होते बिग बी, लग्नासाठी नकार मिळाल्यानंतर नोकरी सोडून मुंबईत आले आणि पालटले नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता/मुंबई - अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी वयाची 76 वर्षे पूर्ण केली आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या अमिताभ यांच्याविषयी लोकांना बरंच काही ठाऊक आहे. पण त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी कदाचितच कुणाला माहित असावे. त्यांचे पहिले प्रेम जया बच्चन किंवा रेखा नाही, तर ब्रिटीश कंपनी ICI मध्ये काम करणारी एक महाराष्ट्रीयन मराठी मुलगी चंद्रा (नाव बदललेले) होती. दोघे कोलकात्यात नोकरी करत होते. बिग बींना तिच्याशीच विवाहदेखिल करायचा होता. पण ते शक्य झाले नाही त्यामुळे बिग बी नोकरी आणि कोलकाता दोन्ही सोडून मुंबईला आले होते. त्यावेळी अमिताभचा 26 दिवसांचा पगारही कापण्यात आला होता. अमिताभबरोबर ब्लॅकर अँड कंपनीमध्ये तीन वर्षे काम करणारे त्यांचे मित्र दिनेश कुमार यांनी divyamarathi.com सोबत काही खास किस्से शेअर केले आहेत.

 

थिएटरमध्ये एका नाटकादरम्यान झाली होती भेट... 
- दिनेश यांनी सांगितल्यानुसार, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणा-या या मराठी तरुणीसोबत त्यांची पहिली भेट एका थिएटरमध्ये नाटकादरम्यान झाली होती. 
- दिनेश यांनी सांगितले की, दुसऱ्या ब्रिटीश कंपनीत काम करणारी चंद्रा आधी अमिताभबरोबर लग्नासाठी तयार होती. पण नंतर तिने नकार दिला. बरेच समजावल्यानंतरही ते शक्य झाले नाही. 
- त्यानंतर काही दिवसांनी चंद्रा ब्रिटिश रेल्वेत काम करणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीबरोबर वर्ल्ड टूरवर निघून गेली. परत आल्यानंतर अमिताभ यांनी तिला लग्नासाठी विचारले तेव्हा तिने नकार दिला. 
- दिनेश यांच्या मते अमिताभ यांनी नोकरी आणि कोलकाता सोडण्यामागचे एक मोठे कारण हा धक्का हे होते.

 

नोकरी सोडणे ठरले आयुष्याचा टर्निंग पॉइंट...

-अमिताभ यांनी 26 डिसेंबर 1968 रोजी ब्लॅकर कंपनीत राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांचा पगार जवळपास 1500 होता. पण त्यांना 30 नोव्हेंबर 1968 पर्यंतचीच सॅलरी देण्यात आली होती. 
- याबाबत कंपनीच्या डायरेक्टरने ट्रस्टीना लेटरही लिहिले होते. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना फुल अँड फायनल पेमेंट मिळाले. 
- या लेटरची कॉपीही कोलकात्याच्या लास्ट ऑफिस ब्लॅकर कंपनीतून मिळाली आहे. 
- दिनेश यांच्या मते अमिताभ यांनी नोकरी सुरू केली तेव्हा त्यांचा पगार 600 रुपये होता. त्यांच्या चांगल्या कामामुळे कंपनीने 4 वर्षांत हजार रुपयांची पगारवाढ दिली होती. ही पगारवाढ त्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या 16 जणांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक होती. 
- डिसेंबर 1968 पूर्वी अमिताभ बच्चन यांवी ब्लॅकर अँड कंपनीची एमडी श्रीकांत केबिन यांनी केबीनमध्ये बोलवून नोकरी सोडण्याचे कारण विचारले होते. त्यावेळी बिग बी थोडे शांत राहिले आणि हळू आवाजात पर्सनल असे म्हणत त्याठिकाणाहून निघून आले. 
- त्यानंतर 26 डिसेंबरला बिग बींनी कंपनीने दिलेल्या गाडीची चावी परत केली आणि ऑफिसमधून निघून गेले. 
- दिनेश यांच्या मते हा बिग बींच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. 
- बिग बींबरोबर काम केलेले त्यांचे आणथी एक सहकारी बापी मुखर्जी यांनी सांगितले की, अमिताभ ऑफिस टाइमचे पंक्च्युअल होते. 
- सकाळी 9:30 वाजता ते ऑफिसला यायचे. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असल्याने त्यांचे काम कंपनीसाठी क्लाइंटबरोबर डील करणे हे होते. 
- दुपारी 1 ते 2 दरम्यान ते कंपनीकडून मिळालेल्या कारमध्ये बसून बाहेर जेवायला जायचे. 
- सायंकाळी फ्री झालयानंतर पार्क स्ट्रीट ते बैलागंज आणि ली रोडकडे फिरायला जायते. 

 

आज एका प्रसिद्ध बंगाली अभिनेत्याची पत्नी आहे चंद्रा...
-
बिग बींच्या ऑफिसमधील त्याकाळातील मित्र दिनेश आणि विजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बींचे त्या तरुणीवर खूप प्रेम होते. दोघांची भेट एका थिएटरमध्ये नाटकादरम्यान झाली होती. पण त्यांच्या मैत्रीचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही. 
- सुरुवातीला त्या तरुणीने लग्नाच्या प्रश्नावर बिग बींना टाळायचा प्रयत्न केला. मग 1968 साली तिने बिग बींना थेट नकारच कळवला. अखेर दोघांचे ब्रेकअप झाले. त्याचा बिग बींना जबरदस्त धक्का बसला. 
- दिनेश यांच्या माहितीनुसार, बिग बींसोबत त्यांनी यासंदर्भात अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण नेहमी त्यांनी ही गोष्ट टाळली. 
- त्यानंतर त्या तरुणीने एका प्रसिद्ध बंगाली अभिनेत्यासोबत लग्न थाटले. अमिताभ यांना नकार देईपर्यंत, त्या बंगाली अभिनेत्याची एन्ट्री तिच्या आयुष्यात झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...