आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक@76: 160 कोटींच्या लग्झरिअस बंगल्यात राहतात, चांदीचे शोपीस आणि अँटिक पेंटिंग्सनी सजले आहे घर : Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अमिताभ बच्चन आज (गुरुवार) आपला 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे झाला. अनेक सुपरहिट चित्रपट देणारे अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतील जुहूस्थित लग्झरिअस बंगल्यात वास्तव्याला आहेत. 10 हजार स्वेअर फूटमध्ये असलेल्या या बंगल्याची किंमत 160 कोटी रुपये आहे. बिग बींच्या या घराचे इंटेरिअर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. चांदीचे शोपीस आणि अँटिक पेंटिंग्सने त्यांचे घर सजले आहे. इतकेच नाही तर बंगल्याची फ्लोरिंग आणि सिलिंग तंजोर पेंटिंगने सजले आहे.


बालपणीपासून ते आतापर्यंतचे पोट्रेट... 
- अमिताभ यांच्या बंगल्याच्या एका भींतीवर त्यांचे बालपणीपासून ते आतापर्यंतच्या फोटोजचे पोट्रेट लावण्यात आले आहेत. या फोटोजमध्ये बिग बींच्या मातोश्री तेजी बच्चन, वडील हरिवंशराय बच्चन, पत्नी जया, मुले अभिषेक आणि श्वेता यांची झलक बघायला मिळते.


- बंगल्याची फ्लोरिंग इटॅलियन मार्बलची आहे. तर बाथरुम फिटिंग्स खास फ्रान्स आणि जर्मनीहून मागवण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुम वेगळ्या थीमवर सजवण्यात आली आहे. ड्रॉइंग रूमपासून ते लिव्हिंग एरियापर्यंत सर्व रुममध्ये सुंदर सजावट करण्यात आली आहे. 

 

बंगला नंबर 2- बिग बींच्या दुस-या बंगल्याचे नाव 'प्रतीक्षा' आहे. 'जलसा'मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी ते याच बंगल्यात राहात होते. आईवडिलांसोबतची अनेक वर्षे त्यांनी या बंगल्यात घालवली. अभिषेक आणि श्वेता यांचे बालपण याच बंगल्यात गेले. या बंगल्याची किंमत 80 कोटी इतकी आहे.

 

बंगला नंबर 3- 'जनक'मध्ये अमिताभ बच्चन यांचे ऑफिस आहे. येथे ते मीडिया आणि पाहुण्यांशी भेटतात. 

 

बंगला नंबर 4- बिग बींचे आणखी एक घर असून त्याचे नाव वास्ता आहे. हे घर त्यांनी एका मल्टीनॅशनल बँकेला भाड्याने दिले आहे. याचा एक भाग बच्चन कुटुंबीय पार्ट्यांसाठी वापरतात.


बंगला नंबर 5- 2014 मध्ये बिग बींनी 'जलसा' या बंगल्याच्या मागे असलेला एक बंगला त्यांची नात आराध्यासाठी खरेदी केला होता. या बंगल्याची किंमत 60 कोटी इतकी आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, बिग बींच्या घराची खास झलक.... 

बातम्या आणखी आहेत...