आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन आपल्या लाडक्या मुलीला रॅम्पवर पाहून झाले एक्सायटेड, जोपर्यंत मुलगी रॅम्पवर होती बनवत राहिले व्हिडीओ, जे कुणी मध्ये आले त्याला हाताने इशारा करून बाजुला सरकवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मुंबईमध्ये सुरु असलेल्या फॅशन शोमध्ये अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनने रॅम्प वॉक केला. श्वेताने डिजायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी रॅम्प वॉक केला. मुलगी जोपर्यंत रॅम्पवर चालत होती, बिग बी तोपर्यंत व्हिडीओ बनवत होते. एवढेच नाही तर जे कुणी मध्ये आले त्याला ते हाताने इशारा करून मधून सरकायलाही सांगितले. अमिताभ यांच्यासोबत पत्नी जया यादेखील होत्या. जया बच्चनदेखील खूप खुश दिसल्या. श्वेताने यावेळी रेड आणि व्हाइट गोल्डन लेहंगा घालून रॅम्प वॉक केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूजर्स जया बच्चन यांना खुश पाहून खूप हैराण झाले आणि मजेशीर कमेंट्स करू लागले. एका यूजरने विचारले, 'ह्या काकू हसतात पण का ?' दुसरा म्हणाला, 'आज मॅडम हसत आहेत.' एक यूजर म्हणाला, 'बेहेनजी स्माइलिंग.. आज सूर्य पश्चिमेकडून निघाला आहे का ?' दुसरा यूजर म्हणाला, 'क्या बात है.. जयाजी स्माइल सुद्धा करतात. अँग्री यंग मॅनची नेहमी अँग्री दिसणारी वाइफ आहे ही'. एका यूजरने अमिताभ यांच्यावर कमेंट करून लिहिले, 'स्टेजवर रेखाजी परफॉर्म करत होत्या का'

- अमिताभ बच्चन यांनी मुलीचे रॅम्प वॉक करतानाचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवरदेखील शेयर केला आहे. त्यांनी फोटोवर कॅप्शन लिहिले, 'To the best .. always .. tonight elegance grace and dignity 💕💕'.

बातम्या आणखी आहेत...