Home | Flashback | Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts

Birth Anni: हरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन, इंदिरा गांधींसोबत होती घनिष्ठ मैत्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 12, 2018, 12:25 AM IST

12 ऑगस्ट म्हणजे आज अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांची 104थी जयंती आहे.

 • Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts

  मुंबईः 12 ऑगस्ट म्हणजे आज अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांची 104 थी जयंती आहे. 1914 साली ल्यालपुर (पंजाब) येथे त्यांचा जन्म झाला होता. तेजी लग्नापूर्वी अलाहबाद युनिव्हर्सिटीतून सायकॉलॉजीच्या प्राध्यापिका होत्या. येथेच त्यांची भेट हरिवंश राय बच्चन यांच्यासोबत झाली होती. ते येथे इंग्लिश लिटरेचरचे प्राध्यापक होते. भेटीनंतर 1941 साली दोघांनी लग्न केले. तेजी आणि हरिवंश राय बच्चन यांनी यश चोप्रांच्या 'कभी-कभी' (1976) या चित्रपटात कॅमिओ केल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे.

  हरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन...

  - हरिवंश राय यांनी तेजी बच्चनसोबत दुसरे लग्न केले होते.
  - हरिवंश राय यांचे पहिले लग्न 1926 साली श्यामा यांच्यासोबत झाले होते. त्यावेळी ते केवळ 17 वर्षांचे होते.
  - 10 वर्षे त्यांचे पहिले लग्न टिकले.
  - झाले असे, की श्यामा यांचा टीबीमुळे 1936 साली मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या पाच वर्षांनी म्हणजे 1941 साली त्यांनी तेजी यांच्यासोबत दुसरे लग्न केले.
  - अमिताभ (थोरले) आणि अजिताभ (धाकटे) ही हरिवंश राय आणि तेजी बच्चन यांची मुले आहेत. बिग बींनी बॉलिवूडमध्ये करिअर केले, तर अजिताभ बच्चन बिझनेसमन आहेत.


  इंदिरा गांधी यांच्याशी होती तेजी बच्चन यांची घनिष्ठ मैत्री...
  - बच्चन कुटुंबाचे गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध होते.
  - तेजी आणि इंदिरा गांधी जवळच्या मैत्रिणी होत्या.
  - रिपोर्ट्सनुसार, इंदिरा गांधी यांच्या लग्नाआधीपासून दोघींची मैत्री होती.
  - देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजीव गांधी यांच्या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. सोनिया आणि राजीव यांच्या संबंधाची माहिती इंदिरांना करुन देण्याची जबाबदारी तेजी बच्चन यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी जवळपास दोन महिने गेले. तोपर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहात होत्या. अखेर इंदिरांनी विवाहाला मान्यता दिली आणि 25 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी राजीव-सोनिया विवाहबंधनात अडकले.
  - 'कुली'(1983) चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते, तेव्हा ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना भेटायला अमेरिकेहून राजीव गांधी आणि दिल्लीहून इंदिरा गांधी पोहोचल्या होत्या.


  पुढील स्लाईड्सवर बघा, तेजी बच्चन यांचे 7 फॅमिली PHOTOS...

 • Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts
  (L) तेजी बच्चन, नव्या नवेली, अमिताभ, हरिवंश राय, जया, अजिताभ, रमोला आणि इतर फॅमिली मेंबर्स
 • Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts
  धाकटा मुलगा अजिताभ बच्चन आणि रमोला यांच्या लग्नात हरिवंश राय बच्चन, तेजी, अमिताभ, जया आणि अन्य
 • Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts
  'कभी-कभी' या चित्रपटातील कॅमियो सीनमध्ये शशी कपूर, राखीसोबत हरिवंश राय आणि तेजी बच्चन
 • Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts
  (L) तेजी बच्चन, हरिवंश राय, जया, अमिताभ, अजिताभ आणि अन्य फॅमिली मेंबर्स
 • Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts
  पती हरिवंश राय बच्चन आणि मुलगा अमिताभसोबत तेजी बच्चन
 • Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts
  तत्कालिन पंतप्रधान आणि जवळच्या मैत्रीण इंदिरा गांधीसोबत तेजी बच्चन

Trending