आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

K3G नंतर अमिताभ यांनी 'गुलाबो-सीताबो' साठी सुचविले नवीन शॉर्टकट नाव, आयुष्मानने दिली मजेदार प्रतिक्रिया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी ‘गुलाबो-सीताबो’ चित्रपटासाठी नवीन छोटे नाव सुचविले आहे. याबद्दल  ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'नवीन पिढी / पुढची पिढी आपल्या संभाषणामध्ये  LOL, ROTFL, GOAT सारखे लहान नावे वापरते. कभी खुशी कभी गमसाठी मी  K3G नाव शोधले होते जे नंतर सगळ्यांच्या ओठी रेंगाळले. यात  पुढील क्रमांक गुलाबो-सीताबोचा आहे... साठी GiBoSiBo !! जीबो, सीबो। मस्त आहे ना ...?'. त्यांच्या ट्विटद्वारेच चाहत्यांना K3G जी नावाच्यामागची गोष्ट कळली.

  • अमिताभच्या या ट्विटवर, त्यांच्यासोबत या चित्रपटात काम करत असलेल्या आयुष्मान खुरानानेही एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, ' 'SIANACAYBGSSDC (Sir, I am not as creative as you but GiBoSiBo sounds damn cool!)' म्हणजे 'सर, मी तुमच्याएवढा सर्जनशील नाही, परंतु जीबोसीबो खूप मस्त आहे.

हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होईल

या चित्रपटाची निर्मिती जूही चतुर्वेदी यांनी केली आहे, दिग्दर्शन शूजित सरकर यांचे आहे. अमिताभ चित्रपटात प्रकाश नाथ द्विवेदी उर्फ ​​गुलाबोची भूमिका साकारताना दिसणार आहेत, तर आयुष्मान सुनील कुमार शुक्ला उर्फ ​​सीताबोच्या भूमिकेत आहे. याची कथा खडूस  घरमालक आणि त्याच्या भाडेकरूवर आधारित आहे. नलिनीश नील देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे शूटिंग जून 2019 मध्ये सुरू झाले आणि त्यातील बहुतेक चित्रीकरण लखनऊमध्ये झाले. हा चित्रपट 17 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होईल.
 

बातम्या आणखी आहेत...