आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Receives Dadasaheb Phalke Award For Contribution In Indian Cinema

महानायकाचा महासन्मान : अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 1970 च्या दशकापासून मोठ्या पडद्यावर अमिताभ यांनी ठसा उमटावला आहे
  • प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे अमिताभ 23 डिसेंबरच्या वितरण सोहळ्यात अनुपस्थित होते

नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज (रविवार) दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. चित्रपट क्षेत्रात अनेक दशके दिलेल्या महान योगदानासाठी अमिताभ यांना हा पुरस्कार देण्यात आला. 1970 च्या दशकापासून मोठ्या पडद्यावर अमिताभ यांनी ठसा उमटावला आहे. या कार्यक्रमास संपूर्ण बच्चन कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान 23 डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडलेल्या वितरण सोहळ्याला प्रकृतीच्या कारणामुळे अमिताभ बच्चन अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांना आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.अजुन बरेच काम करायचे आहे - अमिताभ 


अमिताभ बच्चन यांनी या पुरस्काराबद्दल भारत सरकार, सुचना व प्रसारण मंत्रालय आभार मानेल. यावेळी आभार प्रगट करताना ते म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे तेव्हापासूनच मी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. या पुरस्कारच्या घोषणेवेळी माझ्या मनात आले की, तुम्ही मला आराम करण्यास सांगत आहात. मात्र अद्याप बरेच काम करायचे बाकी आहे.  

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचाही बोलबाला 


66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचाही बोलबाला राहिला. ‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुधाकर रेड्डी यांना देण्यात आला. 'चुंबक' या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारचे मानकरी ठरले. 'पाणी' या चित्रपटासाठी पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता आदिनाथ कोठारेने स्वीकारला. 'पाणी' या चित्रपटाचा आदिनाथ दिग्दर्शक आहे.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी


सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा

पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा- तेलुगू चित्रपट ‘महानटी’

सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- हेलारो

सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट ‘तारीख’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्ती सुरेश (महानटी)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’

सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- कन्नड चित्रपट ‘केजीएफ’

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट- हरजीता

बातम्या आणखी आहेत...