आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ यांनी शेअर केला 'अमर अकबर अँथोनी'च्या मुहूर्त क्लॅपचा फोटो मुंबईतील 25 चित्रपटगृहांत 25 आठवडे चालला होता चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर आपल्या 43 वर्षे जुन्या 'अमर अकबर अँथोनी' चित्रपटाचा फोटो शेअर केला आहे. यात ते चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई, अभिनेत्री परवीन बाबी, शबाना आझमी, नीतू सिंग, अभिनेते विनोद खन्ना आणि धर्मेंद्र यांच्यासोबत दिसत आहेत. 'अमर अकबर अँथोनी' मुंबईतील 25 चित्रपटगृहात 25 आठवडे चालला असे बिग बीने सांगितले आहे. धर्मेंद्र यांनी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप दिला होता.

अमरची भूमिका धर्मेंद्र यांना झाली होती ऑफर

'अमर अकबर अँथोनी'मध्ये अमरच्या भूमिकेत विनोद खन्ना, ऋषी कपूर अकबरच्या भूमिकेत आणि अमिताभ बच्चन अँथोनीच्या भूमिकेत होते. अमरची भूमिका सर्वप्रथम धर्मेंद्र यांना देण्यात आली होती. त्यावेळी ते मनमोहन देसाई यांच्यासोबत 'चाचा भतीजा' चित्रपटाचे शूटिंग करत होते. पण त्यावेळी धर्मेंद्र इतर बर्‍याच चित्रपटांमध्ये व्यस्त होते आणि त्यांना त्यांचे शेड्युल कमी करायचे होते. त्यामुळे त्यांनी देसाई यांची ऑफर नाकारली. यामुळे मनमोहन देसाई यांनी  विनोद खन्ना यांना या भूमिकेत कास्ट केले.

अमिताभ यांना बघून इम्प्रेस झाले नव्हते देसाई

मनमोहन देसाई यांची 1972 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिली भेट झाली होती. लेखक सलीम खान यांनी दोघांची ओळख करून दिली.  पण पहिल्या भेटीत देसाई अमिताभ यांच्यावर इम्प्रेस झाले नव्हते. ते म्हणाले होते, "मी फक्त त्याला एकच भूमिका देऊ शकतो आणि ती म्हणजे चिकन रोल." अमर अकबर अँथोनीमध्ये जेव्हा देसाई यांनी अमिताभ यांचा मीरर सीन पाहिला तेव्हा ते त्यांचे कायमचे फॅन बनले. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी अमिताभ यांना सांगितले की, ते कधीही त्यांना सोडू शकतात, पण मी तुम्हाला कधीही सोडणार नाही."

या चित्रपटासाठी अमिताभ यांना त्यांचा पहिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. देसाईंसोबतचा अमिताभचा हा पहिला चित्रपट होता. या जोडीने नंतर 'परवरिश', 'सुहाग', 'नसीब', 'देशप्रेमी', 'कुली' आणि 'गंगा जमुना सरस्वती' अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.