आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Replies To An Irani Fan Who Tweeted About The Death Of Her GrandMother

इराणी फॅनने ट्विटमध्ये लिहिले - माझी आजी हे जग सोडून गेली, 18 मिनिटांत अमिताभ यांनी रिप्लाय देताना म्हटले - ऐकून दुःख झाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम अॅक्टिव राहणा-या सेलिब्रिटींंपैकी एक आहेत. ते इंडस्ट्रीशी निगडीत अपडेट्ससह सामाजिक मुद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात, शिवाय चाहत्यांनाही ते वेळोवेळी रिप्लाय देत असतात. अलीकडेच त्यांनी रेहन रेजेई नावाच्या एका इराणी चाहतीला रिप्लाय दिला. तिने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या आईच्या निधनाची बातमी बिग बींपर्यंत पोहोचवली होती. 

18 मिनिटांत बिग बींनी केले रिप्लाय... 
रेहनने बुधवारी रात्री 10:57 वाजता एक फोटो  शेअर करुन ट्विट केले, "माझी आजी हे जग सोडून निघून गेली आहे."  तिने ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांना मेंशन केले होते. रेहनच्या ट्विटनंतर 18 मिनिटांनी बिग बींनी तिला रिस्पॉन्स दिला. त्यांनी रात्री 11: 15 वाजता लिहिले, "हे ऐकून मला दुःख झाले. माझी प्रार्थना आणि सांत्वना तुमच्यासोबत आहेत."  त्यानंतर 56 मिनिटांनी रेहनने बिग बींना धन्यवाद दिले.  तिने ट्विटला उत्तर देताना लिहिले, "तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद सर, कायम स्वस्थ राहा. कृपया आपली काळजी घ्या." 

अमिताभ ट्विटरवर रेहनला फॉलो करतात. रेहनचे प्रोफाइल रेहन रेजेई लव अमिताभ नावाने आहे. ती स्वतःला फ्रिलान्स फोटोग्राफर असल्याचे सांगते. रेहनच्या मागील ट्विटवर नजर टाकली असता तिने 28 नोव्हेंबरच्या ट्विटमध्ये तिची आजी कोमात असल्याचे सांगितले होते. 

  • मनालीत शूटिंग करत आहेत बिग बी...

अमिताभ सध्या दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मनालीत आहेत. येथे त्यांनी तेथील जनतेचे आभार मानले आहेत. बिग बींनी एक फोटो शेअर करुन लिहिले, "हिमाचल प्रदेश, विशेषतः मनाली जेथे मी काम करतोय, तेथील प्रेमळ शुभचिंतकांचे प्रेम देण्यासाठी आणि उदार होऊन देखभाल करण्यासाठी धन्यवाद." 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट मेन लीडमध्ये असून 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.