आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Said, "After My Death, My Wealth Will Be Equally Distributed To My Daughter Shweta And Son Abhishek"

अमिताभ बच्चन म्हणाले - 'माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती मुलगी श्वेता, मुलगा अभिषेक यांना समप्रमाणात मिळेल' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चनचे म्हणणे आहे की, त्यांच्या निधनानंतर त्यांची पूर्ण संपत्ती मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता या दोघांना समप्रमाणात मिळेल. त्यांनी हे वक्तव्य अशातच एका इव्हेंटदरम्यान तेव्हा दिले जेव्हा, त्यांच्या संपत्तीविषयी प्रश्न विचारला गेला होता. 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' चे ब्रँड अँबेसिडर असलेले अमिताभ जेंडर इक्वॅलिटीबद्दल नेहमीच बोलतात.  
 

मार्च 2017 मध्ये केले होते ट्वीट... 
मार्च 2017 मध्ये अमिताभ बच्चनने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ते एक प्लेकार्ड घेऊन उभे दिसत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी जेंडर इक्वॅलिटीला हॅशटॅग करत लिहिले, "आम्ही सर्व सारखे आहोत. फोटोच सर्वकाही सांगत आहे." प्लेकार्डवर लिहिले होते. "जेव्हा माझे निधन होईल आणि माझ्याकडे असलेली सर्व संपत्ती मागे सोडून जाईल. तेव्हा ती माझी मुलगी आणि माझा मुलगा दोघांना समप्रमाणात वाटली जाईल."
 

अमिताभ यांचे आगामी चित्रपट...   
अमिताभ सध्या 'कौन बनेगा करोडपती' च्या 11 व्या सीजनमध्ये होस्ट म्हणून दिसत आहेत. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या चित्रपटात दिसणार आहेत. जो 20 सप्टेंबरला रिलीज होऊ शकतो. याव्यतिरिक्त 2 ऑक्टोबरला रिलीज होणार चिरंजीवी स्टारर 'सई रा नरसिम्हा रेड्डी' मध्येही त्यांचा कॅमियो पाहायला मिळणार आहे. अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र', शूजित सरकारचा 'गुलाबो सिताबो' यांसह त्यांचे आणखी काही चित्रपट रांगेत आहेत.