आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Said I Should Retire I'm Tired Now, Different Thoughts Come To My Mind

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी आता थकलो, मनात वेगवेगळे विचार येतात; त्यामुळे आता रिटायर व्हायलाच हवे, बिग बींनी दिले निवृत्तीचे संकेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अमिताभ बच्चन यांना त्यांचे चाहते बऱ्याच वर्षांपासून सतत काम करताना पहात आले आहेत. शतकाचा हा सुपरस्टार कदाचित कधीच थकणार नाही किंवा कधीही थांबणार नाही, असा विचार बहुतेकांनी केला आहे. पण अमिताभदेखील माणूस आहेत आणि आता आपल्या कामातून निवृत्त होण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे.


आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये, अमिताभ यांनी लिहिले: 'मला आता निवृत्त झाले पाहिजे ... माझे मन काहीतरी वेगळे विचार करत आहे, बोटे कुठेतरी जात आहेत, हा माझ्या शरीराचा मला संदेश आहे'. हा महत्त्वपूर्ण विचार समोर ठेवण्यासाठी अमिताभ यांनी एक तारीख निवडली. त्यांनी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 12.26 वाजता आपल्या ब्लॉगवर पोस्ट केले. या दिवशी त्यांचे दिवंगत वडील हरिवंश राय बच्चन यांचा हा 112 वी जयंती होती. प्रवासाबद्दल आभार मानत असल्यासारखे अमिताभ यांनी ब्लॉगवर लिहिले.. त्यांनी लिहिले..., मेरे रास्ते में पड़ने वाले हर पड़ाव को मेरा धन्यवाद्. यावरुन ते आता कोणताही चित्रपट करणार नाही अशी चर्चा या ब्लॉगनंतर सुरू झाली आहे.

  • कसा आणि कधी आला त्यांच्या मनात हा विचार...

खरं तर, 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन यांना बुधवारी मनाली येथे जायचे होते, मात्र खराब हवामानामुळे फ्लाइट डायवर्ट करावी लागली. त्यामुळे त्यांना काही वेळ चंडीगढ आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबावे लागले. त्यानंतर कारने ते मनालीला रवाना झाले. आपल्या या प्रवासादरम्यान त्यांनी रिटायर होणार असल्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी निसर्गाचे सौंदर्य टिपले. थंड वातावरण, शुद्ध हवा, छोटे गाव, वस्ती, ताजेपणा याचा उल्लेखही त्यांनी आपल्या ब्लॉकमध्ये केला आहे.

  • बऱ्याच दिवसांपासून ते याचा विचार करत होते...

अमिताभ गेल्या काही दिवसापासून अभिनयातून रिटायर होण्याचा विचार करत आहेत. काही काळापूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, शरीर आता थकले आहे. त्यानंतर, त्यांनी रुग्णालयाच्या पलंगावर विश्रांती घेत फुटबॉल सामना पाहण्याचे छायाचित्र टाकले हाेते. त्यानंतर परदेशातील एका मोठ्या पुस्तक महोत्सवात आजाराचे कारण देत जाण्यास नकार दिला होता. आताा त्यांनी आपल्या ब्लॉगवरून स्पष्ट केले की, आता आपल्याला विश्रांती घ्यायची आहे. खरं तर, यावर्षी अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात पन्नास वर्षांचा प्रवास पूर्ण केला, कारण पन्नास वर्षांपूर्वी फेब्रुवारी 1969 मध्ये त्यांनी आपला पहिल्या हिंदुस्थानी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते त्यांचा पहिला चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला.

  • ट्विट करुन अमिताभ यांनी दिला आठवणींना उजाळा

27 नोव्हेंबर रोजी दिवंगत कवी डॉ. हरिवंश राय बच्चन यांची 112 वी जयंती होती. अमिताभ बच्चन यांनी टि्वट करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बिग बी यांनी 27-28 नोव्हेंबर रोजी रात्री ट्विट केले आणि या वर्षाचे कॅलेंडर त्यांच्या वडिलांच्या जन्माच्या वर्षाच्या कॅलेंडरशी मिळते-जुळते असल्याचे सांगितले. 1901  पासून आतापर्यंत 13 कॅलेंडर्स आले आहेत, ज्यात तारीख व दिवस सारखीच होती, असे अमिताभ यांनी लिहिले.

  • तीन चित्रपट आहेत प्रदर्शनाच्या मार्गावर

अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच 'कौन बनेगा करोडपती 11'चे चित्रीकरण पूर्ण केले. आता ते 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. डिसेंबर  2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. याशिवाय ते इमरान हाश्मीसोबत 'चेहरे'मध्ये झळकणार असून हा चित्रपट 24 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होईल.  'चेहरे'पूर्वी बिग बींचा 'गुलाबो-सिताबो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणाने त्यांच्यासोबत काम केले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

  • ब्रॅण्ड एन्डॉर्समेंटमध्ये आहेत व्यग्र

टीव्ही आणि चित्रपटांव्यतिरिक्त बिग बी जाहिरातींमध्येही बिझी आहेत. कल्याण ज्वेलर्स, कॅडबरी, डाबर, इमामी, आईसीआईसीआई बँक, नेरोलक, जेन मोबाइल, गुजरात टूरिज्मचे ते ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत.