आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Shared A Photo Of Aishwarya Aradha Wrote In Caption 'It's A Joy To See Smiles On Children's Faces'

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ऐश्वर्या-आराध्याचा फोटो, कॅप्शनमध्ये लिहिले - 'मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहून आनंद होतो' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा आपल्या कुटुंबियांचे विशेष फोटोज शेअर करत असतात. अशातच त्यांनी आपली सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्याचा एक सुंदर फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले - 'आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहणे सर्वात मोठा आनंद आहे.'

 

 

 

पिंक जर्सीमध्ये दिसल्या ऐश्वर्या आणि आराध्या... 
फोटोमध्ये आराध्या ऐश्वर्याच्या मांडीवर बसलेली आहे. दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. हा फोटो प्रो कबड्डी लीगदरम्यानचा आहे. ऐश्वर्या आणि आराध्या, अभिषेक बच्चनची टीम पिंक पँथरला सपोर्ट करण्यासाठी पोहोचल्या होत्या. आई मुलीची ही जोडी टीमच्या पिंक जर्सीमध्ये दिसत आहे. बिग बींनी शेअर केलेला हा फोटो पाहून वाटत आहे की, ते आउटडोर शूटिंगदरम्यान आपल्या कुटुंबाला खूप मिस करत आहेत.  

 

 

 

सतत चित्रपटांत व्यस्त आहेत अमिताभ...  
यापूर्वी त्यांनी आपला अपकमिंग चित्रपट 'गुलाबो सिताबो' च्या सेट्सवरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटोज त्यांनी पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपल्यानंतर शेअर केले होते. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग लखनऊमध्ये केले गेले. हा चित्रपट शूजित सरकार डायरेक्ट करत आहेत. अमिताभ यांच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त अमिताभ चित्रपट 'चेहरे', 'झूंड' आणि तेलगु चित्रपट 'मेरा यार है तू' मध्येदेखील व्यस्त आहेत.