आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले मुलगा अभिषेकचे एक जुने पत्र, लिहिले - 'पूत सपूत तो क्यों धन संचय...' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी रात्री मुलगा अभिषेक बच्चनचे एक पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी यासोबत लिहिले, "अभिषेक आपल्या स्टाईलमध्ये...एक पत्र माझ्यासाठी, जेव्हा मी एका आउटडोअर शेड्यूलसाठी शहराबाहेर होतो." बिग बींनी पुढे लिहिले, "पूत सपूत तो क्यों धन संचय, पूत कपूत तो क्यों धन संचय." अभिषेकने हे पत्र तेव्हा लिहिले होते जेव्हा तो छोटा होता आणि आउटडोअर शूटसाठी गेलेल्या वडिलांना मिस करत होता. 

बिग बींच्या ट्वीटवर अभिषेकचे उत्तरदेखील आले. त्याने अमिताभ यांना टॅग करत आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, 'अर्थात, क्रिएटिव्ह लेटर राइटिंगचा कोर्स करण्या अगोदर लिहिलेले पत्र."

अभिषेकने पत्रात हे लिहिले होते... 

प्रिय पप्पा,

तुम्ही कसे आहात ? आम्हाला सर्वांना तुमची खूप आठवण येत आहे. पप्पा तुम्ही लवकरच घरी परत याल. मी तुमच्या हास्यासाठी प्रार्थना करत आहे. देव आपली प्रार्थना ऐकत आहे. काळजी करू नका. मी आई, श्वेता दीदी आणि घराची काळजी घेईन. कधी कधी मी खोड्या करतो. तुमच्यावर खूप प्रेम करतो पप्पा.  

तुमचा प्रिय मुलगा अभिषेक