आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Shared First Martial Arts Film Of India Enter The Girl Dragon Teaser Directed By Ram Gopal Verma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम गोपाल वर्मांच्या मार्शल आर्ट्स फिल्ममध्ये थरारक स्टंट करताना दिसली मराठमोळी अभिनेत्री, बिग बींनी दिल्या शुभेच्छा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता एक महिलाप्रधान मार्शलआर्ट अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ‘एन्टर द गर्ल ड्रॅगन्स’ असे या चित्रपटाचे नाव असून यात मराठमोळी अभिनेत्री पूजा भालेकर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. चित्रपटात ती ब्रूस लीची मोठी चाहती असल्याचे दिसते. राम गोपाल वर्मांनी काल चित्रपटाचा टीझर रिलीज केला.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या आगामी चित्रपटाचा टिझर आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करुन रामू यांचे कौतूक केले आहे. “रामू यांच्या आगामी चित्रपटाला माझ्या शुभेच्छा” असे म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली.

‘एन्टर द गर्ल ड्रॅगन्स’च्या टिझरची सुरुवात जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूस लीच्या “तुमच्यावर फक्त स्वत:च तुम्हीच मात करु शकता” (the only one who can stop you is you) या वाक्याने होते. या टिझरमध्ये अभिनेत्री पूजा भालेकर ब्रूस लीच्या शैलीत फाईटिंग करताना दिसत आहे. हा चित्रपट भारत आणि चीनच्या को-प्रॉडक्शनमध्ये तयार झाला आहे.  

बातम्या आणखी आहेत...