आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी ठगांचे सेनापती बनण्यासाठी घातले 40 किलोंचे कवच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: ठग्ज ऑफ हिन्दोस्तानचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरसोबतच चित्रपटाच्या पात्रांच्या कथा समोर येत आहेत. ठगांची भूमिका साकरणारे अमिताभ बच्चन म्हणाले की, आझादची भूमिका करणे आणि अॅक्शन ड्रामा सिनेमात स्टंट्स करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.
बिग बींनी सांगितले शूटिंगसंबंधीत किस्से 


स्टंट करण्याचे माझे वय नाही 
अमिताभ बच्चन म्हणाले की, मी आता 75 वर्षांचा आहे. स्टंट करण्याचे माझे वय नाही. परंतु मला डायरेक्टर विक्टर(विजय कृष्ण आचार्य) यांनी सांगितल्यामुळे हे करावे लागले. परंतु शूटिंग दरम्यान केलेल्या स्टंट्सची किंमत मला आजही मोजावी लागत आहे. अमिताभ यांनी सांगितले की, शूटिंग दरम्यान झालेल्या इजेमुळे आजही मला डॉक्टरांकडे जावे लागतेय. 

 

आर्मर सर्वात मोठे चॅलेंज होते 
अमिताभ बच्चन यांचे आर्मर त्यांच्यासाठी त्यांच्या भूमिकेपेक्षा चॅलेंजिंग होते. कारण हे घालणे खुप आवश्यक होते. त्यांना एक क्रुर योध्द्यांच्या रुपात दिसायचे होते. बिग बींनी मान्य केले की, लांब केस, जड अवजार सांभाळत शूटिंग करणे खुप अवघड होते. शूटिंग दरम्यान पाठदुखीच्या तक्रारीमुळे अनेक वेळा हॉस्पिटलमध्येही जावे लागले. 

 

घातला होता लोखंडी कवच 
आझादच्या भूमिकेसाठी पहिले अमिताभ यांच्या कॉस्ट्यूममध्ये लोखंडाचा कवच ठेवण्यात आला. परंतु नंतर विक्टरने हे लेदरचे बनवले. परंतु लेदर आर्मर घालणेही अवघड होते. कारण त्याचे वजनही 30 ते 40 किलोग्राम होते. यानंतर अमिताभ यांच्या हातात दोन तलवार, कटार आणि पगडीही होती. यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. 

 

अशा परिस्थितीत होता भारत
चित्रपटात अमिताभ यांच्या भूमिकेचे नाव खुदाबख्श आहे. परंतु त्यांचे अनुयायी त्यांना आझाद म्हणतात. ते ब्रिटिशांना भारता बाहेर काढण्याचा विडा उचलतात. ही कथा 1839 मध्ये फिलिप मेडोज टेलरच्या बुक कन्फेशन्स ऑफ अ ठगवर आधारीत आहे. तेव्हा भारताला हिन्दुस्तान किंवा हिन्दोस्तान म्हटले जात होते.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...