आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिममध्ये व्यायामामुळे झाला त्रास, अमिताभ बच्चन यांना आठवला शाळेत छडीने खाल्लेला मार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियावर रात्री उशिरापर्यंत अ‍ॅक्टिव्ह असतात. ते गेल्या काही दिवसांपासून कधी रात्री 1 वाजता  तर कधीकधी रात्री 3 वाजता पोस्ट करत असतात. अलीकडेच त्यांनी रात्री उशिरा फेसबुकवर एक कविता शेअर केली. ज्यात त्यांनी जीममध्ये घालवलेल्या वेळेची तुलना बालपणी शाळेत पडलेल्या मारासोबत रंजक पद्धतीने केली. (त्यांनी लिहिलेली कविता त्यांच्याच शब्दांत येथे देतोय), बिग बींनी लिहिले, ''आज जिम में कुछ जरूरत से ज्यादा दबा, चला, उठा लिया, मन ने जो कहा, हिम्मत करके उसे एक स्थान दिया, अब रात्रि बेला में कुछ करवटें, पड़ रही हैं अति ढीली, प्रातः पता चलेगा, कौन मासपेशियां पड़ गईं नीली,  स्कूल में जब बेंत पड़ती थी तो सुबह ज्ञात होता था हमें, पिछले अंग में दिखाई देती थीं, काले रंग की लकीरें.''

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता 

ही कविता वाचल्यानंतर, बिग बींचे चाहते त्यांच्या तब्येतीविषयी काळजीत पडले. एका चाहत्याने लिहिले की, तुम्ही काही काळ व्यायाम करू नये. ज्याला बिग बींनी उत्तर दिले- होय, बहुधा. दुसर्‍या चाहत्याने लिहिले की, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या घटनांमधून नेहमीच थोडी ऊर्जा मिळवता, ही अनेकांसाठी प्रेरणा आहे. याला उत्तर देताना बिग बींनी लिहिले- तुम्हा सर्वांचे प्रेम आम्हाला जिवंत ठेवते.

बातम्या आणखी आहेत...