आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या मुलाला महिलेने थिएटर बाहेर मारली होती कानाखाली, म्हणाली होती- कुटूंबाचे नाव बदनाम करु नको

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिषेक बच्चनने आपल्या आयुष्याविषयी एक किस्सा नुकताच शेअर केला. अभिषेकला मुंबईच्या एका फिल्म थिएटर बाहेर एका महिनेने कानाखाली मारली होती. एवढेच नाही तर महिला अभिषेकला म्हणाली होती की, तु कुटूंबाचे नाव बदनाम करु नको. अभिषेकने मीडिया हाउसच्या प्रोग्राममध्ये सांगितले की, 16 वर्षांपुर्वी त्याचा पहिला सिनेमा 'शरारत'च्या स्क्रीनिंग दरम्यान ही घटना घडली होती. 

 

महिलेने अभिषेकाल अॅक्टिंग बंद कर असे बजावले होते 
- अभिषेकने सांगितले की, 'तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही. माझा 'शरारत' हा सिनेमा रिलीज झाला आणि लोकांचा रिस्पॉन्स जाणुन घेण्यासाठी मी मुंबईच्या गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये गेलो होतो. इंटरव्हल दरम्यान तो थिएटरच्या बाहेर स्टँडवर उभा होता. याच वेळी एक महिला बाहेर आली आणि तिने मला कानाखाली मारली. यानंतर महिला म्हणाली की, तु तुझ्या कुटूंबाचे नाव बदनाम करतोय. अॅक्टिंग बंद कर.'
- अभिषेकचा 'मनमर्जिया'नुकताच रिलीज झाला आहे. त्याने यामध्ये रॉबी भाटियाची भूमिका साकारली आहे. यासोबतच चित्रपटात विक्की कौशल आणि तापसी पन्नू लीड रोलमध्ये आहेत. 
- या चित्रपटाच्या रिलीजनंतर अभिषेक म्हणाला की, तो यानंतर मुलगी आराध्याचा विचार करुन चित्रपटात काम करेल. मुलाला पाहण्यासाठी जे सिनेमे योग्य असतील अशातच तो काम करेल.

 

पत्नी ऐश्वर्यासोबत अभिषेक सुरु करणार चित्रपटाची शूटिंग 
- अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनने अनुराग कश्यपच्या 'गुलाब जामुन' चित्रपटासाठी होकार दिला आहे. या वर्षी या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार अशा चर्चा आहेत.
- या चित्रपटाची चर्चा दिर्घकाळापासून होत आहे. स्क्रिप्ट ऐश्वर्या-अभिषेकला आवडलेली आहे. परंतु त्यांना यामध्ये काही बदल करायचे होते. बदल केल्यानंतर त्यांनी सिनेमाला होकार दिला. 
- अभिषेक बच्चनचा आगामी सिनेमा 'हेरा-फेरी 3' आहे, तर ऐश्वर्या 'फन्ने खां' सिनेमात शेवटच्यावेळी दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...