आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चनने मुंबईतील आरे मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांचे टोचले कान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असून त्यासाठी आरे कॉलनीत मेट्रोसाठी कारशेड उभारली जाणार आहे. मात्र, यामुळे झाडे तोडावी लागणार असल्याने सामाजिक संस्थांसह भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी याला विरोध केला आहे.  मेट्रो जलद, सोयीस्कर आणि उपयुक्त असल्याचे सांगत प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आरेतील मेट्रो कारशेडला पाठिंबा देत याला विरोध करणाऱ्यांचे कान टोचत घरच्या बागेत झाडे लावली आहेत का, असा प्रश्न केला आहे. यावरून आता शिवसेना, मनसेसह काँग्रेसच्या रडारवर अमिताभ बच्चन आले असून ते याला काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये २७०० झाडे तोडण्यात येणार आहेत. मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता असतानाही मनपाने झाडे तोडण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेत मेट्रोसाठी कारशेड उभारण्यास विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी तर आरेचे नाणार होईल, असा इशाराही दिला आहे.  प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिक झाडे लावा. मी आमच्या घराच्या बागेत झाडे लावली आहेत, तुम्ही लावलीत का, असा प्रश्नही त्यांनी केला.


जयराम रमेश यांच्याकडून  आदित्य ठाकरेंचे कौ
तुक
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी शिवसेना तसेच उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. आरे काॅलनीतील जंगल वाचवण्यासाठी मेट्रो कार शेडला विरोध करण्याची भूमिका घेतल्याबद्दल रमेश यांनी सेनेचे आभार मानले. रमेश म्हणाले, शिवसेना आमचा विरोधी पक्ष आहे. पण, कधीतरी शिवसेना शहाण्यासारखी वागते. आरेतील जंगल वाचवण्यासाठी उद्धव व आदित्य यांनी भूमिका घेतल्याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.