आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालंधर | सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीजन सुरु आहे. आता सर्वांना जालंधरमध्ये होणा-या कॉमेडियन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथच्या लग्नाची प्रतिक्षा आहे. क्लब कबानाने बॉलिवूड आणि देशभरातून येणा-या पाहूण्यांच्या स्वागताच्या तयारीस सुरुवात केली आहे. कपिल शर्माने बिग बी अमिताभ बच्चन यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. त्यांनीही लग्नात सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे. तर गिन्नीच्या घरी शॉपिंग सुरु आहे. गिन्नी शहरात नाही.
काही दिवसांपुर्वी गिन्नीच्या वाढदिवशी कपिल शर्माने सोशल मीडियावर आपले आणि गिन्नीचे फोटोज शेअर केले होते. रविवारी मुंबईमध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गिन्नी कपिलसोबत होती. क्लब कबाना आणि कपिलच्या इव्हेंट मॅनेजर यांची पुढची मीटिंग झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरु होईल.
बिग बीने कपिलला दिला गिन्नीला आनंदी ठेवण्याचा गुरुमंत्र
कपिल शर्मा दोन दिवसांपुर्वी बिग बींचा शो केबीसीमध्ये पोहोचला होता. येथे येऊन त्याने अमिताभ यांना लग्नाचे आमंत्रण दिले. या दरम्यान अमिताभ कपिलला म्हणाला - 'तु लग्न करणार असे ऐकलेय?यावर कपिलने अमिताभ यांना लग्नाचे निमंत्रण दिले आणि म्हणाला की, 'तुमचा थोडा सल्ला हवा होता, बायकोला आनंदी ठेवण्याचा गुरुमंत्र सांगा' हे ऐकूण अमिताभ पुर्ण जोशमध्ये येऊन म्हणाले की, 'पत्नीने काहीही म्हटले तरी बोलण्यापुर्वी तु सॉरी म्हण. तुझे सर्व दुःख, वेदना दूर होतील.' यासोबतच बिग बींनी कपिलच्या लग्नाचे आमंत्रण स्विकारले. पण ते कपिलच्या लग्नाच्या कोणत्या पार्टीमध्ये सहभागी होतील हे अजून क्लिअर झालेले नाही.'
जागरणने होणार विवाह सोहळ्याची सुरुवात
- 10 डिसेंबर : कपिलच्या बहिणीच्या घरी भगवती जागरण
- 11 डिसेंबर : जालंधरमध्ये गिन्नीच्या घरी संगीत आणि मेंदी सेरेमनी होईल.
- 12 डिसेंबर क्लब कबानामध्ये लग्न
- 14 डिसेंबर : अमृतसरमध्ये रिसेप्शन. यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी होईल.
रिसॉर्टमध्ये तयारी सुरु
कपिल आणि गिन्नीच्या लग्नासाठी कबाना रिसॉर्ट अँड स्पा फायनल करण्यात आले आहे. रिसॉर्टचे व्हाइस प्रेजीडेट रोहितने सांगितले की, रिसॉर्टच्या बाहेर 40 हजार स्क्वेअर फीट लॉन एरिया आहे. येथे स्टेज सवजण्यात येणार आहे. सप्तपदीसाठी बाहेरच लॉनमध्ये सोय करण्यात येणार आहे. डायरेक्टर ऑप्रेशंस हेमंत सूरीने सांगितले - भारतिय आणि इंटरनॅशनल दोन्हीही पध्दतीचे जेवण असेल. तर कपिल शर्मा अमृतसरचा आहे यामुळे मेन्यूमध्ये अमृतसरी स्पेशल डिश असेल. ऑप्रेशन मॅनेजर विद्यांत, फूड अँड बेवरेज मॅनेजर कमल किशोरवर डेकोरेशन, खाण्यापिण्याची जबाबदारी असणार आहे. लग्नाच्या डिशेजमध्ये काय असणार आहे यासाठी कपिल इव्हेंट मॅनेजिंग टीम, रिसॉर्ट टीमसोबत मिळून फायनल करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.