आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Tweeted That He Received His Very First National Award From M Karunanidhi

एम. करुणानिधींच्या हातून अमिताभ बच्चनने घेतला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार, शेअर केल्या आठवणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: एम. करुणानिधींच्या निधनानंतर तामिळ सिनेमातील कलाकारांनी आपले दुःख व्यक्त केले आहे. तर बॉलिवूड कलाकारांनी आठवणी ताज्या केल्या आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ट्विटर हँडलवर एम करुणानिधींच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांची एक आठवण शेअर केली. अमिताभ यांनी सांगितले की, मी माझा सर्वात पहिला नॅशनल अवॉर्ड एम करुणानिधी यांच्या हस्ते घेतला होता. तेव्हा ते तामिळनाडूचे सीएम होते. 


सात हिंदूस्थानीसाठी मिळाला होता अवॉर्ड 
सात हिंदूस्थानी, 1969 मध्ये रिलीज झालेला हा अमिताभ बच्चन यांचा सर्वात पहिला चित्रपट होता. चित्रपटात अमिताभ यांच्या पात्राचे नाव अनवर अली अनवर होते. तो एक उर्दू कवी होती. डायरेक्शन, प्रोडक्शन, स्क्रीनप्ले आणि कथा ख्वाजा अहमद अब्बास यांची होती. 
- सात हिंदूस्थानीचे लिरिसिस्ट कैफी आजमीलाही बेस्ट लिरिस्टचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...