आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Will Get Dada Saheb Phalke Nashanal Film Award, But He Is Not Able To For The Award Function Due To Poor Health

दादा साहेब फाळके अवॉर्डने बिग बींचा सन्मान; या कारणामुळे पुरस्कार सोहळ्याला राहिले अनुपस्थित, आता 29 डिसेंबरला मिळेल हा अवॉर्ड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सोमवारी दिल्लीमध्ये 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांनादेखील चित्रपटसृष्टीतील स‌र्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. परंतु त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजरी राहू शकले नाहीत. चित्रपट क्षेत्रात अनेक दशके दिलेल्या योगदानासाठी अमिताभ यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती स्वतः बिग बींनी एका ट्वीटमध्ये दिली होती. त्यांनी सांगितले की, तापेमुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. यामुळेच ते या कार्यकत्रमाला गैरहजर राहिले.  

29 डिसेंबरला मिळेल बिग बींना अवॉर्ड... 


सोहळ्याच्या सांगता सोहळ्यादरम्यान माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली की, 29 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद विजेत्यांची भेट होणार आहे. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनाही 50 व्या दादा साहेब फाळके अवॉर्डने सन्मानित केले जाईल.  

हे कलाकारदेखील होणार सन्मानित... 


अमिताभ यांच्याव्यतिरिक्त श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ ला सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळणार आहे. विकी कौशलला ‘उरी’ आणि आयुष्मान खुरानाला ‘अंधाधुन’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड दिला जाईल. तसेच तेलगु अॅक्ट्रेस कीर्ती सुरेशला ‘महानटी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळेल. राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांच्या ज्यूरीचे चेअरमन राहुल रवैलने ऑगस्ट 2019 मध्ये पुरस्कारांची घोषणा केली होती. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संपूर्ण यादी... 

बेस्ट अॅक्टरविकी कौशल, आयुष्मान खुराना

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर

स्वानंद किरकिरे, चुंबक
बेस्ट अॅक्ट्रेसकीर्ती सुरेश (तेलुगु)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेससुरेखा सीकरी, बधाई हो
बेस्ट डायरेक्टरआदित्य धर, उरी द सर्जिकल स्ट्राइक
बेस्ट चाइल्ड आर्टिस्टपीव्ही रोहित, समित सिंह, ताला अर्चलरेशु श्रीनिवास पोकाले
बेस्ट चिल्ड्रन फिल्म सरकारी हीरिया प्राथमिक शाले कसरगोदू (कन्नड)
बेस्ट लिरिक्समंजुथा, (नाथीचरमी)
बेस्ट मेकअप आर्टिस्टरंजीत
बेस्ट स्पोर्ट्स फिल्मस्वीमिंग थ्रू डार्कनेस
बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूजचलो जीते हैं
बेस्ट शॉर्ट फिल्म कसाब
बेस्ट इन्व्हेस्टीगेशन फिल्मअमोली
बेस्ट एज्युकेशन फिल्मसर्लभ विरला
बेस्ट सोशल इश्यू फिल्मताला ते कुंजी
बेस्ट एनव्हायरमेंटल फिल्मद वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर
स्पेशल मेंशन अवॉर्ड महान हुतात्मा डायरेक्टर सागर पुराणिक 
बेस्ट म्यूझिकज्योती, केदार दिवेकर
बेस्ट एडिटिंगसनराइज, हेमंती सरकार
बेस्ट ऑडियोग्राफीचिल्ड्रन ऑफ सॉइल, बिश्वदीप चॅटर्जी 
बेस्ट फिल्म समीक्षकब्लेस जॉनी आणि अनंत विजय
बेस्ट राजस्थानी फिल्म टर्टल 
बेस्ट पंचांग फिल्म इन द लँड ऑफ पॉयझनस वूमन
बेस्ट गारो फिल्म अन्ना
बेस्ट मराठी फिल्म भोंगा
बेस्ट तमिळ फिल्म बरम
बेस्ट उर्दू फिल्म हामिद
बेस्ट बंगाली फिल्म उक जे छिलो राजा
बेस्ट म्यूझिक डायरेक्टरसंजय लीला भन्साळी (पद्मावत)
बेस्ट बॅकग्राउंड अवॉर्डउरी द सर्जिकल स्ट्राइक
मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेटउत्तराखंड
बेस्ट अॅक्शन फिल्म केजीएफ
बातम्या आणखी आहेत...