आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःचा 61 वर्ष जुना फोटो पाहून अमिताभ म्हणाले - 'ज्याचा दिसेल नाडा, तोच आहे छोटा हडकुळा डॉन'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सोशल नेहमीच अॅक्टीव्ह असतात आणि आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात. नुकतेच एका चाहत्याने ट्वीटरवर अमिताभ यांना टॅग करून एक फोटो अपलोड केला. हा फोटो 61 वर्षांपूर्वीचा होता. 

 

चाहत्याने अमिताभ यांना विचारले की, 'मला अलीपूर कोलकाता येथील 1958 सालचा हा फोटो मिळाला आहे. कृपया तुम्ही या फोटोबाबत आणखी माहिती सांगा.' यावर बिग बी यांनी लिहिले की, 'हा फोटो अलीपूर कोलकाताचा नाही तर 1957 सालचा नैनीताल येथील शेरवुड कॉलेजचा आहे. त्या दिवशी आम्हाला सुटी होती आणि सर्व सीनियर्ससोबत आम्ही फुटबॉल खेळलो होतो.' अमिताभने 1956 ते 1958 तीन वर्ष नैनीतालच्या याच कॉलेजमधून 9th ते 11th पर्यंतचे शिक्षण घेतले होते. 

 


 

अमिताभने फोटोवर उडवली खिल्ली
अमिताभ एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी फोटो पाहून स्वतःची खिल्ली देखील उडवली आणि म्हणाले 'फोटो छापला आहे, सांगा आहे तो कोण? ज्याचा नाडा दिसेल, तोच छोटा हडकुळा डॉन'

 

 

'चेहरे'च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत बिग बी
अमिताभ सध्या इमरान हाशमीसोबत मिस्ट्री-थ्रिलर चेहेर या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटातील अमिताभचा पहिला लुक देखील समोर आला आहे. चित्रपट समीक्षक करण आदर्श यांनी बिग बी यांचा पहिला लुक आपल्या ट्वीटर हँडलवर शेअर केला होता.