आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan's Clothing Imported From Italy For 'KBC' Show, Exclusive Interview With Stylist Priya Patil

'केबीसी' शोसाठी इटलीहून येतो अमिताभ बच्चन यांच्या सूटचा कपडा, स्टायलिस्ट प्रिया पाटीलची खास मुलाखत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 'केबीसी' चे 11 वे सीजन सुरु होणार आहे, शोचे होस्ट अमिताभ बच्चनदेखील देशभरातील स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी तयार आहे. एकीकडे जिथे शोमध्ये बिग बींचा चार्म दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही तसेच ज्याप्रमाणे ते स्वतःला कॅरी करतात, त्यावर लक्ष जाऊ नये हे शक्य नाही. दैनिक भास्करसोबत बोलताना, अमिताभ बच्चन यांची स्टायलिस्ट प्रिया पाटीलने त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले.  
 

अमिताभ यांना 'केबीसी' साठी स्टाइल कारण्याचा तुमचा अनुभव कसा आहे ?
मी 'कौन बनेगा करोडपती' सोबत मागच्या 7 वर्षांपासून काम करत आहे. पण मागच्या वर्षीपासूनच मी त्यांना वैयक्तिकरित्या स्टाइल करायला सुरुवात केली होती. मला त्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद होतो आहे करत ते बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठे आणि सन्मानित स्टार्सपैकी एका व्यक्तीसोबत काम कारण्याचीबी सन्मान आहे. जेव्हा त्यांना स्टाइल करण्याची वेळ येते तेव्हा ते खूप मोकळ्या मानाने सल्ले ऐकतात अनेकदा तर ते आपले स्वतःच्या स्टाइल टिप्सदेखील त्याला जोडतात. आमची 10 स्टायलिस्टची एक टीम आहे, जी त्यांचे लुक्स परफेक्ट करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करते. मागच्या एका वर्षांपासूनदेखील स्टाइल करत आहे ज्याचा अनुभवदेखील खूप चांगला आहे.  
 

या सीजनमध्ये तुम्ही त्यांना कोणत्या वेगळ्या स्टाईलमध्ये तयार करणार आहात ?
या सीजनमध्ये अमिताभ यांचा क्लासिक लुक आहे आणि ही एक अशी स्टाइल आहे, जी त्यांना पर्सनली खूप आवडते. तरीही सीजनमध्ये, मी थ्री-पीस सूट ठेवणार आहे जो मागच्यावर्षीच्या सीजनपासून नेव्ही ब्लू ब्लॅकसारख्या वेगळ्या आणि गडद आणि औपचारिक रंगांसोबत कायम आहे. मी टाय नॉटसोबत खूप एक्सपेरिमेंट करणार आहे, जसे की, - द एल्ड्रेड नॉट, द ट्रिनिटी नॉट आणि द रोज नॉट, यांसारखी काही नावे आहेत. जी क्लासिक सूटला बोल्ड लुक देतील. त्यांना जो लुक आवडतो, त्यासाठी मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करते.  
 
ज्या फॅब्रिकमध्ये 120 प्लस थ्रेड काउंट्स होतात तेच आम्ही वापरतो. त्यांच्या कपड्याचे फॅब्रिक इटलीहून इम्पोर्ट केले जातात आणि त्यामुळे योग्य साहित्य सामग्री खरेदी करायला खूप वेळ लागतो आणि आणि परफेक्ट फिटसाठी प्रयत्न केले जातात. हे साहित्य खरेदी करण्यापूर्वी कॅमेरासाठी फिट होण्यासाठी त्याची स्क्रीन टेस्ट केली जाते आणि मग ऑर्डर केले जातात. संपूर्ण प्रक्रिया यापद्धतीने पूर्ण केली जाते. शेवटी काहीही बदल करावे लागू नये.  
 
त्यांच्या कोटची बाटणेदेखील अनेक देशांमधून मागवली जातात. ज्यामध्ये इंडिया, इटली, टर्की, जापान आणि कोरियाहे देश सामील आहेत. बटन्सदेखील आम्ही स्पेशल डिजायनरकडून बनवून घेतो. प्रत्येक गोष्ट आम्ही खूप काळजीपूर्वक बघतो आणि आम्हाला माहित आहे की, शोचे शूटिंग अनेक तास चालते, बराच वेळ त्यांना सीटवर बसावे लागते आणि यामुळे बच्चनजींना कम्फर्टेबल राहणे खूप गरजेचे आहे. खरे सांगू तर माझे डिजाइन बिग बींना स्टायलिश दाखवत नाही तर उलट अमिताभजीच माझ्या डिजाइनला उत्तम बनवतात. ते जे काही परिधान करत ते एक स्टाइल स्टेटमेंट बनते.  
 

अमिताभ बच्चनदेखील स्टाइलमध्ये आपले इनपुट देतात का ?
ते सल्ला देण्यासाठी आणि घेण्यासाठीही खूप मुक्त आहेत. वास्तविक मागच्यावर्षी त्यांनी टायवर ब्रोच लावले होते कारण आम्हाला काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करायचा होता. आम्हाला ब्रोच बनवायचे होते कारण हे बाजारात उपलब्ध नव्हते आणि मागच्यावर्षी त्यांचा पहिला प्रोमो ऑन-एयर करण्याबरोबर स्टाइलदेखील लॉन्च केली गेली होती आणि काही आठवड्यातच मुंबईमध्ये सर्व फॅशन आउटलेटमध्ये तसे ब्रोच मिळू लागले. हे सर्व लुक अद्भुत शिल्प कौशल आणि ब्रांडोंच्या मदतीने तयार केले गेले होते, जे माझ्यासाठी खूप मोठा आधार ठरले. यावर्षी आम्ही त्यांच्या जॅकेटसाठी लाइट लुकवर काम करत आहोत. जसे की, न्यूनतर लॅपेल पिन जी त्यांच्या टायमध्ये वापरली जाईल. 
 

अमिताभ यांच्याव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या सेलेब्रिटीजला स्टाइल करतेस ?
बच्चन यांच्याव्यतिरिक्त किरन खेर याचीदेखील स्टायलिस्ट आहे आणि वेगवेगळ्या रियलिटी शोसाठी त्यांना स्टाइल केले आहे. माझ्यामते जेव्हा एथनिक फॅशनची गोष्ट येते तर त्या बॉलिवूड उद्योगामध्ये राणी आहेत. तर त्यांच्यासोबत काम करायला मजा येते. 

बातम्या आणखी आहेत...