आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan's Makeup Artist Deepak Sawant Says 'it Is A Rumour That Big B Has Been Hospitalised'

अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल असल्याची निव्वळ अफवा आहे, बच्चन यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी केला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्‍चनहे मागील तीन दिवसांपासून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल असल्याची बातमी खोटी अफवा असल्याचे कळते आहे. गुरुवारी संध्याकाळी एका इंग्रजी वेबसाइटने बिग बींना लिव्हर ट्रीटमेंटसाठी रुग्णलयात दाखल केले गेल्याचा दावा केला होता. मात्र जेव्हा दैनिक भास्करने याबद्दल माहिती काढली तेव्हा हे चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले. मागील 40 वर्षांपासून अमिताभ यांचे मेकअप आर्टिस्ट असलेल्या दीपक सावंतने हि बातमी केवळ अफवा असल्याचे सांगितले.  

हे आहे दीपक सावंतचे पूर्ण स्टेटमेंट... 
बच्‍चन साहेब रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात जात असतात. ज्या वेबसाइटने ते एडमिट असल्याची बातमी चालवली, त्याने खूप बेजबाबदार काम केले आहे. त्या वेबसाइटची क्रेडिबिलिटी पूर्वीपासूनच संदिग्‍ध राहिलेली आहे. त्याने अर्धवट माहिती दिली. रुटीन चेकअप व्हिजिटला हॉस्‍पिटलमध्ये एडमिट असल्याची बातमी बनवले गेले. असे अजिबात नाहीये. बिग बी ज्या वयाचे आहेत, त्यामुळे त्यांना नियमित चेकअपसाठी जावे लागते. ही खूप सामान्य गोष्ट आहे. 

या कारणाने उडाली अफवा... 
दीपकने पुढे सांगितले, "झाले असे की, मागील तीन-चार दिवसांपासून 'केबीसी 11' साठी त्यांचे कोणतेही शूट झाले नाही. आम्हालादेखील सुट्टी मिळालेली होती. सेटवरील बिग बींच्या गैरहजेरीला हॉस्पिटलमध्ये एडमिट असल्याची बातमी बनवले गेले. पुढे ते 'केबीसी' चे शूट पूर्ण करतील आणि त्यानंतर लगेच चित्रपट 'चेहरे' चे पेंच वर्क पूर्ण करतील. जे परदेशात होणार आहे. त्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' च्या शूटिंगसाठीदेखील आउटडोअरला जाणार आहेत. जर त्यांची तब्येत चांगली नसती तर त्यांनी आउटडोअरला जाण्याचा प्लॅन का बनवला असता."