आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन यांनी लखनऊमध्ये चित्रपट गुलाबो सिताबोचे शूटिंग सुरु केले आहे. यादरम्यान सेटभरून त्यांचा पहिला फोटो लीक झाला आहे. हे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, बिग-बी चित्रपटात एका वयस्कर मुस्लिम व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. मोठ्या नाकासोबत त्यांना ओळ्खणेही कठीण झाले आहे.
पुढच्यावर्षी 24 एप्रिलला रिलीज होईल चित्रपट...
शूजित सरकारच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या चित्रपटात आयुष्मान खुरानादेखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट पुढच्यावर्षी 24 एप्रिलला रिलीज होईल. अमिताभ यांचा लुक लीक होताच फॅन्समध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढली आहे. त्यांचा फोटो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केला जात आहे.
फिल्म क्रिटिक तरण आदर्शनेदेखील बिग-बीचा लुक आपल्या ट्विटर हैंडलवर शेअर केला.
Unveiling Amitabh Bachchan's quirky character look from #GulaboSitabo... Costars Ayushmann Khurrana... Directed by Shoojit Sircar... 24 April 2020 release. pic.twitter.com/Tg2V678xSu
— taran adarsh (@taran_adarsh) June 21, 2019
बिग बींनी सांगितला पहिल्या दिवसाचा अनुभव...
अमिताभ यांनीं शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा अनुभव आपल्या ब्लॉगवर सांगितला आहे. त्यांनी लिहिले होते, 'पहिला दिवस, पहिलाच असतो आणि पहिल्या दिवशी या एका गोष्टीची प्रतिज्ञा होते की, तुम्ही तुमच्या कामाबद्दल समर्पित राहाल. हा दिवस खूप थकवणारा होता पण अशा आहे की, आम्हाला लवकरच याची सवय होईल. हे सुरु झाले आहे आणि हे खूप महत्वपूर्ण आहे. चित्रपटाची टीम आणि कलाकार आपले सर्वश्रेष्ठ काम करण्यासाठी तयार आहे.'
अमिताभ यांचे ट्वीट...
याव्यतिरिक्त त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करून लिहिले, 'गेलो तर असे होते, बाहेर निघालो शूटिंगसाठी तर हे बनलो...काय बनलो हे सांगू शकत नाही आता.'
T 3199 - गए तो ऐसे थे ऐसे, बाहर निकले शूटिंग के लिए तो ये बन गए ,,, क्या बन गए ये बता नहीं सकता अभी !🙏🤨🌹🤣 pic.twitter.com/DOxKeVh7mg
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 19, 2019
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.