आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक@76: फक्त 25% लिव्हर जिवंत राहूनही 76 वर्षांच्या वयात बिग-बी करत आहेत 14 ते 15 तास काम, हे आहेत 5 कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क: अमिताभ बच्चन आज 76 वर्षांचे झाले आहे. एवढे जास्त वय असूनही त्यांचे काम आणि मेहनत सर्वांनाच विचार करायला भाग पाडते. वयाच्या 76 व्या वर्षी बिग-बी एवढे फिट आणि अॅक्टिव्ह कसे आहेत हा प्रश्न सर्वांना पडतो. 102 नॉट आउटचे डायरेक्टर उमेश शुक्लाने खुलासा केला होता की, अमिताभ वयाच्या 75 व्या वर्षीही नियमित 14 ते 15 तास काम करतात. तर अमिताभ बच्चन यांनी स्वतः खुलासा केला होता की, त्याचे 75 टक्के लिव्हर खराब झाले आहे. आता ते फक्त 25% लिव्हरवर जिवंत आहेत. 


2015 मध्ये हेल्थ मिनिस्ट्रीच्या एका प्रोग्राममध्ये अमिताभ म्हणाले होते की, "मला हेपेटायटिस बी(Hepatitis B) हा आजार आहे. मी 2000 मध्ये रेग्यूलर चेकअप करण्यासाठी गेलो, तेव्हा मला या आजाराचे निदान झाले. डॉक्टरांनी सांगितले की, माझे 75 टक्के लिव्हर काम करत नाही." अमिताभ यांना टीबीचा आजार होऊन गेलेला आहे.  ऐवढे असूनही ते या 5 गोष्टींमुळे नेहमीच फिट राहतात. 

 

कसे फिट राहतात अमिताभ...
- स्मोकिंग करत नाही 

अमिताभ बच्चन मूव्हीजमध्ये सिगारेट पिताना दिसत असतील, परंतु ते ख-या आयुष्यात ते स्मोकिंग करत नाहीत. स्मोकिंग न करणे हे त्यांच्या हेल्दी राहण्याचे रहस्य आहे. कारण स्मोकिंग शरीराच्या प्रत्येक अंगाला नुकसान पोहोचवते. 

 

- अल्कोहल, चहा-कॉफी पित नाही 
ते अल्कोहॉलिक ड्रिंक आणि चहा, कॉफी अव्हॉइड करतात. संशोधनात सिध्द झाले आहे की, अल्कोहल प्यायल्याने ब्रेन, हार्ट लिव्हर आणि दूसरे ऑर्गन खराब होतात. जास्त प्रमाणात चहा, कॉफी पिणे धोकादायक असते. 

 

- गोड अव्हॉइड करतात
पेस्ट्री आणि केससोबतच गोड पदार्थ खाणे अव्हॉइड करतात. यामध्ये हाय कॅलरी असतात, ज्या आरोग्याला नुकसान पोहोचवतात. 

 

- नॉनव्हेज पदार्थ खात नाहीत 
अमिताभ बच्चन नॉनव्हेज पदार्थ खात नाहीत. आता ते पुर्णपणे शाकाहारी भोजन घेतात. शाकाहारीमध्ये बॅलेन्स डायट घेतात. 

 

- वर्कआउट करणे विसरत नाही 
बिग-बी वर्कआउट करणे कधीही विसरत नाहीत. मॉर्निंगमध्ये योगा करतात. शूटिंग दरम्यानही ते एक्सरसाइजसाठी वेळ काढतात. 
 

बातम्या आणखी आहेत...