आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिपूर्णता माझ्यासाठी आजदेखील एक स्वप्न आहे, रोज स्वत:ला इम्प्रूव्ह करतो - अमिताभ बच्चन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी आपला 76 वा वाढदिवस साजरा केला. ते नेहमीच आपल्या वाढदिवशी कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे पसंत करतात. खास करून लहान मुलांसोबत. या मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी वाढदिवस, आगामी चित्रपट आणि महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली... 


तेलुगू चित्रपट 'सेरा नरसिंहा रेड्‌डी'च्या निर्मात्यांनी बच्चन साहेबांच्या 76व्या वाढदिवशी फर्स्ट लुक रिलीज केला. चिरंजीवी अभिनीत या चित्रपटात अमिताभ नरसिंहा रेड्‌डींचे गुरू गोसाई वेनकन्ना यांचे पात्र साकारत आहेत. 

 

- वाढदिवसाचा तुम्हाला एवढा त्रास का होतो? 
बळजबरीचा तमाशा आहे वाढदिवस...! हा फक्त सामान्य माणसाच्या आयुष्यातील आणखी एक दिवस आहे. 

 

- तुम्ही अनेक वर्षांपासून इतरांसाठी जगत आहात. 'आता खूप झाले. आता मला स्वत:साठी जगायचे, असे वाटते का? 
तुम्हा असे का वाटत आहे? दुसऱ्यांना समर्पित असलेले जीवन जगण्यामध्ये जे समाधान मिळते, ते दुसरीकडे कुठेच मिळू शकणार नाही. 'खूप होणे' माझ्यासाठी एका कलावंताच्या दृष्टीने खूपच कमकुवत अवस्था असेल. आता हे खूप झाले, अशी जाणीव ज्या दिवशी एका कलावंताला होईल त्या दिवशी त्याचे आयुष्य संपेल. मी दररोज काहीतरी नवीन शिकण्यावर विश्वास ठेवतो. 

 

- एक अभिनेता, कलावंत, संगीतकार आणि भारतीय या नात्याने तुमची कोणती स्वप्ने अद्याप पूर्ण झालेली नाहीत? 
अभिनेता या नात्याने पूर्ण न झालेली माझी लाखो स्वप्ने आहेत. परिपूर्णता माझ्यासाठी आजही एक स्वप्न आहे. कलावंत म्हणून मी दररोज स्वत:ला इम्प्रूव्ह करतो. एक संगीतकार म्हणूनही मी दररोज काहीतरी नवीन शिकतो. माझ्यासाठी संगीत ईश्वराशी कनेक्ट होण्यासारखे आहे. संगीत मी माझ्या अंतर्गत वेडापायी शिकतो. भारतीय या नात्याने आपल्या देशाची गणना विकसनशील नव्हे तर विकसित राष्ट्र म्हणून व्हावी, असे मला नेहमीच वाटते. 

 

- 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये तुमचा गेटअप, पात्र, संवादांची चर्चा होत आहे. तुमच्यासाठी  मेकअप, वजनदार कपडे घालून जबरदस्त अॅक्शन दृश्ये करणे कठीण होते? 

होय, 'ठग्स ऑफ िहंदोस्तान'साठी वजनदार कपडे घालून अॅक्शन दृश्ये करणे खूपच कठीण होते. कोणतीही गोष्ट सोपी नसते. मला माझ्या पात्राचा मेकअप करून घेण्यामध्ये ३ ते ४ तास लागले होते. मात्र, एकदा तुम्ही वचन दिले तर प्रोफेशनल म्हणून तुम्हाला निर्माता-दिग्दर्शकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मान्य करावी लागते. 

 

-  'दीवार'चा रिमेक बनवल्यास तुम्ही शशी कपूर व तुमच्या पात्रामध्ये कुणाला पाहाल? 
माझ्या मते, इंडस्ट्रीमध्ये सध्या अनेक चांगले कलावंत आहेत. ते शशी कपूर आणि माझे पात्र आमच्यापेक्षाही चांगले साकारू शकतात. मात्र, पूर्ण आदराने सलीम-जावेद यांचे लिखाण आणि स्क्रिनप्लेची पुनरावृत्ती होणे कठीण बाब आहे, असे मला वाटते. 

 

- तुम्ही महिलांच्या सुरक्षेकडे कसे पाहता? 
खास करून कामाच्या ठिकाणी महिलेवर कधीही कोणत्याही प्रकारचा अत्याचार होता कामा नये. अशा घटनांची माहिती तत्काळ संबंधितांना दिली पाहिजे. त्यांच्या विरोेधात कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे लहान मुलांना शिस्त, नागरिक, सामाजिक आणि नैतिक अभ्यासक्रमाची माहिती जाणीवपूर्वक दिली पाहिजे. महिला व मुलांना खास सुरक्षेची गरज आहे. कामाच्या ठिकाणी त्यांचे नम्रपणे स्वागत करा. 

बातम्या आणखी आहेत...