आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ यांनी सांगितली आपले आडनाव 'बच्चन' यामागची कहाणी, म्हणाले - 'हे कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : अमिताभ बच्चन यांचे म्हणणे आहे की, त्यांचे आडनाव (बच्चन) कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यांनी याचा खुलासा 'कौन बनेगा करोडपती' च्या कर्मवीर एपिसोडच्या शूटिंगदरम्यान केला. जो महात्मा गांधी यांच्या 50 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला टेलीकास्ट होणार आहे. हा एपिसोड गांधी यांचे फॉलोअर डॉ. बिंदेश्वर पाठक आणि दोन वर्षांपासून देशातील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान मिळवणाऱ्या इंदूर महानगरपालिका कमिश्नर आशीष सिंह यांच्यासोबत शूट केला गेला. अमिताभ यांनी शूटिंगदरम्यान अनेक रंजक खुलासे केले.  

'बच्चन' एका आडनावामागची कहाणी... 
अमिताभ यांनी 'केबीसी' च्या सेटवर सांगितले, "माझे आडनाव बच्चन कोणत्याही धर्माचे नाहीये. कारण बाबूजी धर्म आणि जातीविरुद्ध होते. आधी आमच्या कुटुंबाचे आडनाव श्रीवास्तव होते. मला हे सांगतांना गर्व वाटत आहे की, 'बच्चन' हे आडनाव वापरणारा आमच्या कुटुंबातील मी पहिला व्यक्ती आहे. जेव्हा मी किंडरगार्टनमध्ये प्रवेश घेतला होता, तेव्हा बाबूजींना आडनाव विचारले गेले तेव्हा आपल्या उपनामाला कुटुंबाचे आडनाव बनवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा जनगणना येतात तेव्हा आणि मला माझा धर्म विचारतात तेव्हा मी नेहमी उत्तर देतो की, मी कोणत्याही धर्माचा नाहीये, मी भारतीय आहे." 

'बाबूजी शौचालय स्वच्छ करणाऱ्यांसोबत साजरी करायचे होळी...'
शूटिंगदरम्यान जेव्हा बिंदेश्वर पाठक म्हणाले की, शौचालय स्वच्छ करणाऱ्यांना कोणताही सन्मान न मिळणे चिंताजनक बाब आहे. तेव्हा अमिताभ यांनी बाबूजींशी निगडित एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, "मी सांगू इच्छितो की, बाबूजी आपल्या आसपासच्या लोकांचा सन्मान करायचे. होळीशी निगडित एक परंपरा होती की, प्रत्येक व्यक्ती सर्वात मोठा आणि सन्मानित व्यक्तीच्या पायांवर रंग टाकून या उत्सवाचा प्रारंभ करायचा. बाबूजी त्या व्यक्तीच्या पायांवर रंग टाकायचे, ज्याने उत्सवाच्या आधी शौचालय स्वच्छ केलेले असेल." 

बिंदेश्वर यांना स्वच्छतेचा संकल्प घेऊन एक सुलभ शौचालय नावाची मोहीम सुरु करण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी आतापर्यन्त देशातील 1749 शहरांमध्ये सुमारे 9500 पे अँड यूज शौचालयांची निर्मिती केली आहे आणि त्यांच्या मोहिमेअंतर्गत 15 लाख पेक्षा जास्त घरात शौचालय बनले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...