आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष 2012 मध्‍ये बिग बींना शनीदेव आणखी प्रतिष्ठा मिळवून देणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍या अभिनयाने आणि स्‍वभावामुळे रसिकांच्‍या ह्दयाचा ठाव घेणारा बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्‍चन यांना 2012 वर्ष पुन्‍हा यशाच्‍या शिखरावर नेणारे ठरणार आहे.
अमिताभ यांच्‍या कुंडलीत राजयोग बनत आहे. यामुळे त्यांच्या यशाच्या मार्गातील अडचणी आपोआप दूर होणार आहेत. त्‍यांच्‍या कुंडलीतील नवमाश स्थानात मंगळ आणि राहूची युती अंगारक योग बनवणारी आहे. या योगामुळेच अमिताभ यांना सुपरस्‍टारचा किताब, प्रसिद्धी, पद, प्रतिष्‍ठा आणि संपत्ती अधिक भर घालणारी ठरणार आहे. अमिताभ यांच्‍या कुंडलीत शनीची स्थिती उत्तम आहे. शनीच्‍या प्रभावामुळे अमिताभ यांच्या चाहत्यांची संख्या खूप आहे. ती दिवसागणित वाढणार आहे.
अमिताभ यांची जन्‍म रास तूळ असून 15 नोव्‍हेंबर 2011 रोजी त्‍यांच्‍या राशीत शनीने प्रवेश केला आहे. शनीची उच्‍च राशी तूळ असल्‍यामुळे 2012 वर्ष त्‍यांच्‍यासाठी खूप चांगले जाणारे असेल. अमिताभ यांच्‍या कुंडलीत पहिल्‍या स्‍थानाचा स्‍वामी शनी कुंडलीतील चौथ्‍या स्‍थानी आहे आणि चौथे स्‍थान सुख देणारे असते.
अमिताभ बच्चन यांच्‍यासाठी कसे असेल 2012 वर्ष
15 नोव्‍हेंबरपासून अमिताभ यांच्‍यासाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्‍यामुळे त्‍यांना काही अडचणी बरोबर अचानक धन लाभाचे योग देखील आहेत. जानेवारी 2012 च्‍या शेवटच्‍या आठवडयात शनी मार्गी होणार असल्‍यामुळे आरोग्‍याशी संबंधित अडचणी निर्माण होतील. साडेसातीमध्‍ये शनी अमिताभ यांच्‍याकडून काही महत्‍वाचे कामे करून घेतील. साडेसातीच्‍या प्रभावामुळेच अमिताभ यांच्‍या प्रतिष्‍ठेत वाढ होत आहे.
जाणून घ्या, का अर्पण करतात देवांना फुले
जाणून घ्या अंक 2 असणा-या लोकांसाठी कसे आहे हे वर्ष
जाणून घ्‍या...वर्ष 2012 मध्‍ये कसे असेल आपले लव्‍ह लाईफ?
जाणून घ्‍या...अंकशास्‍त्रानुसार कोणाच्‍या नशीबात असेल गुरूवारी पैसा