आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभच्या पुढाकारातून ३६० शेतकरी कर्जमुक्त; ४४ शहिदांच्या कुटुंबीयांनाही दाेन काेटी २० लाखांची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी अात्महत्या वाढत असल्याचे एेकून व्यथित असलेला बाॅलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी अाता बळीराजाला कर्जाच्या जाेखडातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला अाहे. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पात्र असलेल्या राज्यातील सुमारे ३६० शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी बच्चन यांनी २.०३ काेटी रुपयांची मदत केली. यापैकी बहुतांश शेतकरी हे विदर्भ-मराठवाड्यातील अाहेत. तसेच राज्यातील ४४ शहिदांच्या कुटुंबीयाच्या ११२ सदस्यांना २.२०कोटी रुपयांचे वाटप केले. रविवारी सायंकाळी बच्चन यांच्या ‘जनक’ बंगल्यावर हा कार्यक्रम झाला.    


मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक-दीड महिन्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अापली इच्छा व्यक्त केली हाेती. राज्य सरकारने नुकताच शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला अाहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा जास्त अाहेे त्यांच्यासाठी ‘वन टाइम सेेटलमेंट’ याेजना अाणली अाहे. या याेजनेनुसार ज्या शेतकऱ्याकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज अाहे त्यांनी वरची रक्कम खात्यात जमा केल्यास दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकताे. मात्र, अनेक शेतकरी ही वरची रक्कम भरू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळत नसल्याकडे मुख्यमंत्र्यांनी बच्चन यांचे लक्ष वेधले हाेते. तसेच ही जास्तीची रक्कम तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात भरल्यास अापाेअापच त्यांना कर्जमाफी मिळेल, असेही सुचवले हाेते. अमिताभ यांना ही कल्पना आवडली. त्यांनी तातडीने अशा शेतकऱ्यांची यादी मागवून घेतली व त्यांच्या खात्यात रक्कम भरणा केली. यापैकी काही शेतकऱ्यांना रविवारी सायंकाळी बंगल्यावर बाेलावून घेतले अाणि जया बच्चन यांच्या हस्ते त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात अाले.


वीरपत्नी, माता-पित्यांना अाधार  
राज्यातील ४४ शहिदांच्या कुटंुबांतील ११२ सदस्यांना बच्चन परिवारातर्फे २.२० काेटींची मदत देण्यात अाली. प्रत्येक परिवाराला देण्यात अालेल्या ठरावीक रकमेपैकी शहिदाच्या वीरपत्नीला ६० %, तर वीर माता-पित्यांना प्रत्येकी २० % रक्कम देण्यात अाली.  


शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावे
केवळ २०० रुपयांच्या कर्जासाठी काही शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्याचे एेकून खूप वेदना झाल्या. अशा गरजूंना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले पाहिजे, असे वाटत हाेते. हा आनंद वेगळे समाधान देऊन जातो. शहिदांच्या कुटुंबीयांनाही जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे. 
- अमिताभ बच्चन, प्रसिद्ध अभिनेते.

 

बातम्या आणखी आहेत...