Home | Divya Marathi Special | amjad-ali-khan-program-in-jaipur

रागांच्या मिलाफातून स्वरयात्रा

सर्वेश भट्ट - जयपूर | Update - May 25, 2011, 12:35 PM IST

दिवसभराच्या तापलेल्या उन्हानंतर पावसाची एखादी छानशी सर आली तर......अगदी अशीच काहीशी सुखावणारी घटना उदयपूरच्या श्रोत्यांनी अनुभवली

  • amjad-ali-khan-program-in-jaipur

    दिवसभराच्या तापलेल्या उन्हानंतर पावसाची एखादी छानशी सर आली तर......अगदी अशीच काहीशी सुखावणारी घटना उदयपूरच्या श्रोत्यांनी अनुभवली.निमित्त होते,अमजद अली खान यांच्या सरोद वादनाचे.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमजद अली खान यांनी कोणताही एकच राग न निवडता वेगवेगûया रागांची सुंदर गुंफण करत केलेले सादरीकरण. भक्तिरसाला केंद्रस्थानी ठेवून निवडलेल्या या रागांमुळे श्रोत्यांनी सूर, ताल, लय यांची अनोखी पखरण अनुभवली.

    उस्ताद अमजद अलींच्या अनोख्या सादरीकरणाबाबत दिव्य मराठी न्यूज नेटवर्कने विख्यात सात्त्विक वीणावादक सलील भट्ट यांच्याशी संपर्क साधून त्यांचे विचार जाणून घेतले. त्यांनी सांगितले की, वादनाची विशिष्ट पद्धत हे अमजद अलींच्या वादनाचे वैशिष्ट्य. यात ते उजव्या हाताच्या बोटांच्या नखांच्या टोकांनी सूर निर्माण करतात. त्यामुळेच त्यांचे सूर संपूर्ण वैशिष्ट्यांसह श्रोत्यांसमोर प्रकट होतात आणि आपले साम्राज्य निर्माण करतात.

    विनापगारी सांस्कृतिक राजदूत
    आमच्यासारखे शास्त्रीय संगीत कलाकार, संगीताच्या माध्यमातून देशाची सेवा करत असतात. या कलेच्या संवर्धनासाठी मेहनत घेत असतात. याच्या मोबदल्यात सरकार अनेकदा आमचा पुरस्कार देऊन सन्मान करत असतात. पण आम्ही ज्या पद्धतीने संस्कृतीच्या योगदानासाठी प्रयत्न करत असतो, त्या दृष्टिकोनातून आम्हाला विनापगारी सांस्कृतिक राजदूत म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही, असे मतही त्यांनी दिव्य मराठी शी बोलताना व्यक्त केले.

Trending