आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवळ्याचे सेवन करुन मिळवा सुंदर केस आणि चमकदार त्वचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आवळ्याचा सीझन सुरू आहे. बाजारात आलेले आवळे पाहून ते घेण्याचा मोह झाला असेल तर आताच आवळे विकत घ्या. कारण सुंदर केसांपासून ते चमकदार त्वचेसाठी आवळा हा अगदी बेस्ट आहे. बाजारातून छान किलोभर आवळे घेऊन या आणि त्याचे सेवन करा. आता आवळ्याचे सेवन नेमके कशा प्रकारे करावे याविषयी आम्ही सांगणार आहोत.

  • मधासोबत घ्या आवळ्याचा रस

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे त्याचे सेवन फारच महत्त्वाचे आहे. आवळा नुसताच खाणे शक्य नसेल तर आवळा किसून त्याचा रस काढून त्यात थोडा मध घाला आणि तो रस प्या. मधामुळे आवळ्याचा रसाला एक वेगळाच गोडवा येतो. त्यामुळे ज्यांना साखर वर्ज आहे तेदेखील हा रस सेवन करू शकता. आता हा रस कधी प्यावा असा प्रश्न पडला असेल तर दररोज सकाळी उपाशीपोटी हा रस घेण्यास काहीच हरकत नाही.

  • आवळा कँडी करुन खाऊ शकता

आता आवळ्याचा रस प्यायची सवय नसेल किंवा त्याची चव आवडत नसेल तर आवळा कँडीही करून खाऊ शकता. आवळा कँडी इतरबाबतीतही फायदेशीर ठरते. आवळा कँडी तयार कशी करायची हे माहीत नसेल तर एका प्लास्टिकच्या पिशवीत आवळे घेऊन ती पिशवी घट्ट बांधून फ्रिजरमध्ये ठेवा. साधारण आठवडाभर ठेवल्यानंतर आवळ्याला आपोआप कळ्या पडतात.  आता हा आवळा घेऊन त्याला साखरेत बुडवून ठेवू शकता. एका काचेच्या बरणीत हे आवळे भरून त्यात साखर घालून ठेवायची आहे. त्यातील साखर आवळ्याला लागेपर्यंत उन्हात ही बरणी ठेवायची आहे. हा आवळा रोज एक फोड खाल्ला तरी चालू शकेल. याचा फायदा असा की, त्वचा चांगली होतेच शिवाय आवळ्यातील घटक जेवण पचवण्यास मदत करतात.

बातम्या आणखी आहेत...